maharashtra

ओगलेवाडी परिसरात तडीपारीतील संशयितास अटक


Tadipari suspect arrested in Oglewadi area
तडीपारीचा आदेश डावलून ओगलेवाडी परिसरात आलेल्या एका संशयितास कराड शहर पोलिसांनी अटक केली. पोलीस अधीक्षक यांच्याकडून कराड शहर पोलीस ठाणे अंतर्गत ओगलेवाडी दुरक्षेत्र हद्दीतील रेकॉर्डवरील ११ संशयीतांच्या टोळीला 6 महिन्याकरता तडीपार करण्यात आले होते. मात्र, तडीपारीचा आदेश डावलून ओगलेवाडी परिसरात आल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. सागर सुभाष सुर्यवंशी (वय २५) रा. हजारमाची ता. कराड असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

कराड : तडीपारीचा आदेश डावलून ओगलेवाडी परिसरात आलेल्या एका संशयितास कराड शहर पोलिसांनी अटक केली. पोलीस अधीक्षक यांच्याकडून कराड शहर पोलीस ठाणे अंतर्गत ओगलेवाडी दुरक्षेत्र हद्दीतील रेकॉर्डवरील ११ संशयीतांच्या टोळीला 6 महिन्याकरता तडीपार करण्यात आले होते. मात्र, तडीपारीचा आदेश डावलून ओगलेवाडी परिसरात आल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. सागर सुभाष सुर्यवंशी (वय २५) रा. हजारमाची ता. कराड असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ओगलेवाडी परिसरातील ११ जणांची टोळी 6 महिन्याकरता तडीपार करण्यात आली आहे. त्यामध्ये रेकॉर्डवरील संशयीत सागर सुर्यवंशी याचा समावेश होता. मात्र, हा आदेश डावलून संशयीत सागर सूर्यवंशी हा शनिवारी २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ओगलेवाडी परिसरात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांना मिळाली. त्यावरुन त्यांच्या पथकाने संशयीत सागर सुर्यवंशी यास ताब्यात घेवून अटक केली. तसेच त्याच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, हवालदार सचिन सूर्यवंशी, महिला पोलीस डुबल, हवालदार कपिल आगलावे यांनी केली.