maharashtra

महात्मा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन


Greetings to Mahatma Phule on the occasion of Punyatithi
थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त रविवारी 28 रोजी कराड नगरपालिकेेतील लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी त्यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

कराड : थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त रविवारी 28 रोजी कराड नगरपालिकेेतील लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी त्यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
यावेळी नगरसेवक मोहसीन अंबेकरी, अमोल सोनवले, विवेक भोसले, मिलिंद कांबळे, अजय भोसले, अमोल कराडकर बबलू भोसले, रामचंद्र भिसे आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, शहरातील अनेक लोकप्रतिनिधी, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी यांनीही महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.