महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

वारकर्‍यांच्या दिंडीचा भीषण अपघात

आळंदी येथील संजीवन समाधी सोहळ्यासाठी येत असलेल्या पायी पालखीच्या दिंडीत एक टेम्पो घुसल्याने झालेल्या अपघातात 30 वारकरी जखमी झाले. ही घटना जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील मावळ तालुक्यातील साते फाटा येथे आज (दि.२७) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दोन महिला वारकर्‍यांचा मृत्यु झाला आहे. तर 30 जण जखमी झाले आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

महाबळेश्वर येथे ‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करणार : खा. शरदचंद्रजी पवार

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व लगतचे तालुक्यांमध्ये स्ट्रॅाबेरी पिकाचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. महाबळेश्वर आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटनाचे ठिकाण असून शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पिक आहे. देशामध्ये ४००० एकर क्षेत्रावर स्ट्रॅाबेरी पिकाचे उत्पादन घेतले जाते. यापैकी ३००० एकर क्षेत्र हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व लगतच्या तालुक्यातील आहे.

esahas.com
महाराष्ट्र

आठवडाभराच्या प्रयत्नानंतर बिबट्याला कैद करण्यात वनविभागाला यश

येणके, ता. कराड येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याने ऊसतोड मजुराच्या मुलावर हल्ला करून त्याला ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेने जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली होती. अखेर सुमारे आठवडाभराच्या प्रयत्नानंतर  बिबट्याला सापळ्यात कैद करण्यात वनविभागाला यश आले आहे. मात्र, एका बिबट्याला कैद केल्यानंतर सुमारे तासाभरातच येणके गावामध्येच दुसऱ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.

esahas.com
महाराष्ट्र

चाळकेवाडी येथे पवनचक्कीमधील साहित्याची चोरी

चाळकेवाडी, ता. सातारा येथे पवनचक्कीमधील साहित्याची चोरी झाली असल्याची घटना घडली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

वडूथ येथील घरफोडीत सुमारे तीन लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरीस

वडूथ, ता. सातारा येथे झालेल्या घरफोडीत सुमारे तीन लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरट्यांनी लांबवला असल्याची घटना घडली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

सातार्‍यात धूम स्टाईल चोरी; सुमारे 90 हजारांचा ऐवज लांबवला

सातार्‍यातील एसटी स्टॅन्ड पाठीमागे पारंगे चौकात मुंबईची प्रवासी असणार्या महिलेची पर्स धूम स्टाईलने आलेल्या बाईकर्सने चोरी केली. याप्रकरणी अर्चना श्रीरंग ढगे (वय 29, सध्या रा.दहिसर, मुंबई मूळ रा.सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

सोशल मीडियावर कारखान्याची बदनामी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

सोशल मीडियावर खोटी कागदपत्रे बनवून साखर कारखान्याची बदनामी होईल, अशी पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी २६ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत कारखान्याच्या प्रशासन विभागातील क्लार्क रणजीत कदम यांनी फिर्याद दिली आहे. ओमकार अरुण साळुंखे रा. रेठरे खुर्द ता. कराड असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

esahas.com
महाराष्ट्र

१ डिसेंबर पासून राज्यातील पहिलीपासून सुरू होणार शाळा

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता दि. 1 डिसेंबरपासून ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तसेच शहरी भागातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड यांनी दिली.

esahas.com
महाराष्ट्र

कोविड-१९ ने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस मिळणार पन्नास हजार रूपये

मा.सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ४ ऑक्टो २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस ५०,०००/- रूपये (रु. पन्नास हजार)  इतका सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

esahas.com
महाराष्ट्र

कराडात मनसेकडून संविधान प्रस्तावना प्रतिमेचे पूजन

भारतामध्ये २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू करण्यात आले. परंतु, २६ नोव्हेंबर १९४९ रोजीच संविधान औपचारिकरीत्या स्वीकारण्यात आले होते. त्यामुळे देशातील तरुणांमध्ये संविधानाच्या मुल्यांचा प्रसार करण्यासाठी जागृती करण्याच्या उद्देशाने २६ नोव्हेंबर रोजी देशभरात संविधान दिन साजरा करण्यात येतो. त्यानुसार शुक्रवारी संविधान दिनानिमित्त कराड शहर मनसेच्या वतीने संविधान प्रस्तावना प्रतिमेचे पूजन करण्यात आले.