रयत शिक्षण संस्थेचे सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड, राष्ट्रीय सेवा योजना, महिला मिलिटरी, जिमखाना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना आणि निवडणूक साक्षरता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'विशेष संक्षिप्त पुनरिक्षण' मतदार नावनोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मतदान नोंदणी संदर्भातील बोर्डाचे अनावरण करण्यात आले.
कराड : रयत शिक्षण संस्थेचे सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड, राष्ट्रीय सेवा योजना, महिला मिलिटरी, जिमखाना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना आणि निवडणूक साक्षरता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'विशेष संक्षिप्त पुनरिक्षण' मतदार नावनोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मतदान नोंदणी संदर्भातील बोर्डाचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने म्हणाले की, मतदान हा आपला अधिकार आहे. एक मत किती महत्वाचे आहे. यावर आपली लोकशाही अवलंबून आहे. यासाठी प्रत्येकाने मतदार यादीत नाव नोंदविले पाहिजे व आपल्या सोबत मित्र, नातेवाईक शेजारी यांना देखील नोंदणी करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. लोकशाही बलवान व्हायची असेल तर प्रत्येकाने मतदान नोंदणी केलीच पाहिजे.
यावेळी उपप्राचार्य प्रा. एस. ए. पाटील, प्रा. नेताजी सूर्यवंशी, प्रा. माधुरी कांबळे, रजिस्ट्रार आर. वाय. गायकवाड, विवेक भोज, प्रा. विद्या पाटील, एन. सी. सी. प्रमुख प्रा. संदीप महाजन, प्रकल्पाधिकारी प्रा. डॉ. तानाजी पाटील, प्रा. डॉ. अभय पाटील, मराठी विभागप्रमुख प्रो. डॉ. रमेश पोळ तसेच शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.