maharashtra

कंटेनरने दुचाकीला चिरडले; वृद्धा ठार

राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्याजवळ घडला थरार

The container crushed the bike; The old woman was killed
पुणे - बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाका येथे आज सकाळी कंटेनर व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकी वरील वृद्ध महिला जागीच ठार, तर दुचाकीस्वार जखमी झाला आहे.

सातारा : पुणे - बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाका येथे आज सकाळी कंटेनर व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकी वरील वृद्ध महिला जागीच ठार, तर दुचाकीस्वार जखमी झाला आहे.
विद्या पटवर्धन (वय 65, रा. सांगली) असे जागीच ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, हा अपघात सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास झाला. पटवर्धन दांम्पत्य दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी दुचाकीला विरमाडे गावच्या हद्दीत कंटेनरने पाठीमागून धडक दिली. सुमारे 20 मीटर कंटेनरने दुचाकीला फरफटत नेले. दरम्यान, या अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.