विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील दहिवडी- फलटण या मार्गावर स्विफ्ट आणि ट्रकच्या समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत 2 युवक जागीच ठार झाल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. दहिवडी येथून दीड ते दोन किलोमीटर अतंरावर असलेल्या पेट्रोल पंपासमोर हा भीषण अपघात झाला. ट्रकचा चालक हा घटनास्थळावरून पळून गेला आहे.
एसटी बसेसवर होणाऱ्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर खटाव तालुका शिवसैनिकांच्या संरक्षणात पुसेगावातून पहिली एसटी रवाना करण्यात आली. उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव आणि सहकाऱ्यांनी एसटीवर दगडफेक कराल तर गाठ शिवसैनिकांशी आहे, असा इशाराही समाजकंटकांना दिला आहे.
ढगाळ वातावरण, बोचरी हवा आणि पावसाच्या रिपरिप सरी अशा विचित्र वातावरणाचा अनुभव सातारकर घेत आहेत. बुधवारी सकाळपासून जोरदार पावसाने सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागाला झोडपले. अचानक आलेल्या पावसाने सातारकरांच्या कामाचा खोळंबा तर झालाच, शिवाय प्रकृतीच्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे.
येथील कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन कृष्णा पुलावर आज बुधवारी १ रोजी सुमारे दोन तासांपेक्षा जास्त काळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. या वाहतूक कोंडीमुळे कृष्णा नाका येथील सिग्नलपासून गजानन हौसिंग सोसायटी आणि कृष्णा कॅनॉलपासून वेणूताई चव्हाण महाविद्यालयापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
कराड शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी सुमारे तास-दिडतास मुसळधार वादळी पाऊस झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी अचानक साडेसहा वाजण्याच्या सुमारास वादळी पावसाची सुरुवात झाली. रात्री आठ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता.
राज्याचे गृहराज्यमंत्री (शहरे) ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांची कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थामधुन विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल कोल्हापूर येथे त्यांच्या निवासस्थानी नगराध्यक्षा निलम येडगे व उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी मलकापूर नगरपालिकेच्या वतीने त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
साताऱ्याच्या मार्केट यार्डमध्ये कांदा बटाटय़ाचा व्यापार करणारा व्यापारी सुशांत श्यामराव बोराटे (वय 38, रा. करंजे पेठ, सातारा) हा मंगळवारी रात्री मित्रांसमवेत यवतेश्वर परिसरात ओली पार्टी करण्यासाठी गेला होता. आज सकाळी काही जणांना तो यवतेश्वरच्या दरीत पडल्याचे दिसून आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सातारा तालुका पोलीस अन् शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने अथक परिश्रम घेऊन त्याला 200 फुट खोल दरीतून जीवंत बाहेर काढले. मात्र, तो स्वतः दरीत पडला की त्याला त्याच्या मित्रांनी दरीत ढकलून दिले, याचा शोध पोलीस घेत आहेत.
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत वारंवार निवेदन देऊनही त्यावर कोणताही तोडगा होत नसल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज बुधवारी सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे पंचवीस मिनिटे झालेल्या रास्ता रोको नंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
दीड लाख रुपयांची रिक्षात विसरलेली रक्कम आणि बॅग प्रामाणिकपणे परत करणारे सातारा तालुक्यातील धावडशी येथील रिक्षाचालक शंकर तुकाराम पवार यांचा सातारा शहर पोलिसांनी सत्कार केला.