maharashtra

अपघातात दुचाकीस्वार ठार


Two-wheeler driver killed in accident
पुणे - सातारा महामार्गावरील पंढरपूर फाटा -शिरवळ येथे दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाला. सर्वेश सुरेश वहिकर (वय ४७ रा. पळशीरोड, शिरवळ) असे त्यांचे नाव आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली.

सातारा : पुणे - सातारा महामार्गावरील पंढरपूर फाटा -शिरवळ येथे दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाला. सर्वेश सुरेश वहिकर (वय ४७ रा. पळशीरोड, शिरवळ) असे त्यांचे नाव आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली.
याबाबत शिरवळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्वेश हे एशियन पेंट या कंपनीत नोकरीला होते. वहिकर हे दुचाकी वरुन (गाडीक्रमांक एमएच १२ पीजे ७७३४ ) सकाळी साडेसहा वाजता कामावर येत असताना पारी कंपनीजवळील श्री इंजनिअरींग समोर वहिकर यांनी पुढे चालणाऱ्या वाहनास पाठीमागुन जोराची धडक दिली, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. यावेळी गंभीर अवस्थेत त्यांना शिरवळ येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने ते मयत झाले. या घटनेचा तपास शिरवळ पोलिस स्टेशनचे सचिन वीर करीत आहेत.