जिल्हा न्यायालयातील ग्रंथालयातील महिला कक्षातून अज्ञात चोरट्याने महिला वकिलाचा कोट चोरला. या कोटामध्ये रोख 34 हजार रुपये, दोन पेन, चष्मा बॉक्स असा मुद्देमाल होता.
सातार्यात स्वेटर विक्रेत्याकडून खरेदी केल्यानंतर पेटीएम कोडद्वारे पैसे पाठवल्याचे नाटक करुन पैसे न देताच फसवणूक करणार्या ठगाला सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) विभागाने अटक केली. पोलिस संशयिताकडे असणार्या ऍपची माहिती घेत आहेत. दरम्यान, चौकशीमध्ये संशयिताने सातार्यातील सुमारे 4 व्यवसायिकांना फसवल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने 30 नोव्हेंबरपर्यंत दोन सदस्यीय प्रभागानुसार प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, 8 डिसेंबरला कच्च्या प्रारूपासह संबंधित नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱयांनी राज्य निवडणूक आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
सातारा जिल्ह्यात सहा नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बहुजनांच्या हक्कासाठी तयारीने उतरणार आहे. जिल्हयातील राष्ट्रीय पक्ष संलग्नित आघाडीशी युती अथवा स्वतंत्र पॅनेल, असे दोन्ही पर्याय रिपाई समोर उपलब्ध आहेत. सहा नगरपंचायतीच्या 102 जागांपैकी किमान 50 जागा ताकतीने लढविणार असल्याची माहिती रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने व थंडीने खटाव व वाई परिसरातील सुमारे 35 शेळ्या-मेंढ्या गारठून ठार झाल्या आहेत. तसेच 10 अत्यवस्थ असून या पशुपालकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
भूसंपादन प्रक्रियेत कमिशनगिरीने धुमाकूळ घालणाऱ्या सतीश धुमाळचे एक-एक कारनामे समोर येत आहेत. आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावरील भूसंपादन प्रक्रियेत शेतकर्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला देताना दलालांच्या मध्यस्थीने 9 टक्के कमिशन घेऊन अधिकारी सतीश धुमाळ किती मालामाल झाला असावा
सातारा जिल्ह्यातील सालपे ता. फलटण येथील एसटी थांब्याजवळ किरकोळ कारणावरुन एकाचा लाकडी दांडक्याने दोघा भावांनी बेदम मारहाण करुन शेतमजूराचा खून केल्याने लोणंद परिसरात खळबळ उडाली आहे. यामध्ये लाकडी दांडक्याने मारहाण करीत खून करणारे संशयित दोघे भाऊ घटनास्थळावरुन फरार झाले असून शोधकार्यासाठी लोणंद पोलीसांचे विविध ठिकाणी पथके रवाना झाली आहे.
सातारा तालुक्यातील शिवथर गावच्या हद्दीत फरशीचा ओढा येथे झालेल्या डंपर आणि ट्रॅक्टरच्या धडकेत एक महिला ठार तर एक जखमी झाली. वंदना जालिंदर शेडगे असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
पुणे - सातारा महामार्गावरील पंढरपूर फाटा -शिरवळ येथे दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाला. सर्वेश सुरेश वहिकर (वय ४७ रा. पळशीरोड, शिरवळ) असे त्यांचे नाव आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली.
मर्ढे ता.सातारा येथे दि. 30 रोजी बंद घरफोडी करुन चोरट्यांनी सुमारे 5 लाख रुपये किंमतीच्या दागिन्यांवर डल्ला मारला असल्याची माहिती समोर आली आहे.