नव्याने आलेल्या "ओमायक्रॉन'च्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणखी सतर्क झाला आहे. विविध देशातून सातारा जिल्ह्यात आलेल्या 13 नागरिकांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले असून नागरिकांनी घाबरु न जाता प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.
अवकाळी पावसामुळे सातारा जिल्ह्यामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झालेले आहे. यामध्ये प्रामुख्याने स्ट्रॉबेरी व द्राक्ष या पिकांचा समावेश आहे. या अनुषंगाने अवकाळी पावसामुळे पुढील नुकसान टाळण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तातडीने दखल घेवून कृषी विभागाशी चर्चा करुन स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना आत्मा योजनेंतर्गत उपलब्ध निधीतून शेतकऱ्यांना तातडीने पीक संरक्षण औषधे पुरवठा करण्यास मंजूरी दिली.
थील कृष्णा कॅनॉल-गोवारे रस्त्याचे दोन वर्षापूर्वी झालेली अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच कॅनॉलची पडझड झाल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला होता. याप्रश्नी बळीराजाच्या वतीने ना. बच्चू कडू यांना निवेदन देण्यात आले होते.
म्हसवड येथील सिद्धनाथ व माता जोगेश्वरीची रविवारी 5 रोजी होणारी रथयात्रा प्रशासनाने अखेर रद्द केली. बॅरिकेंटिंग केलेल्या रथाचे लांबूनच भाविकांना दर्शन घेता येणार असून केवळ लसीकरण झालेल्या भाविकांनाच प्रवेश मिळणार आहे. गुरुवारी प्रांताधिकार्यांच्या उपस्थितीत झालेल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
शिवछत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद 6 डिसेंबर रोजी स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडावर येत आहेत. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव हॅलिकॉप्टर रायगड किल्ल्यावर उतरवले जाणार आहे. मात्र आता यावरून वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रपती महोदयांच्या दौऱ्याला आमचा विरोध नाही पण किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हॅलिकॉप्टर आम्ही उतरु देणार नाही असा पवित्रा येथील शिवप्रेमींनी घेतला आहे.
खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड तालुक्यातील विविध विकासकांमासाठी 2 कोटी 79 लाख रूपायांचा निधी मंजूर झाला आहे. जनसुविधा, नागरी सुविधा, 5054, 3054, इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण योजना तसेच ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ अशा योजनेतून मंजूर झालेल्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळून निधी उपलब्ध झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सातार्यातील तांदूळ आळी येथे बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून वृध्द महिलेला बेदम मारहाण करत चोरी केली. प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी घरातून देवतांच्या मुर्ती चोरी केल्या आहेत. दरम्यान, वृध्द महिला मारहाणीत बेशुध्द पडल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सातारच्या ग्रेड सेपरेटरमध्ये बुधवारी रात्री कार पलटी झाली. भरधाव वेगात कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अपघातात कारची चारही चाके वर झाली होती. अपघातानंतर कार चालकाने क्रेन बोलावून कार ताब्यात घेतली. दरम्यान, अपघातानंतर पीसीआर व्हॅन देखील घटनास्थळी गेली होती.
लग्न झाल्यानंतर दुसर्याच वर्षी पत्नीला पेटवून देवून तिचा खून केल्याप्रकरणी राजेश उर्फ राजू गणपत शिंदे (वय 30, रा.खांबील पोकळे ता.महाबळेश्वर) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश मंगला धोटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान, ही घटना 2017 मध्ये घडलेली आहे.
सातारा शहरात मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून या गुन्ह्यांमध्ये चारजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.