maharashtra

वडगाव हवेली येथे दांम्पत्यास मारहाण

एकास चार दिवसांची कोठडी

Couple beaten at Wadgaon Haveli
वडगाव हवेली ता. कराड येथे पुर्ववैमनस्यातून दांम्पत्याला सुरीने मारहाण करुन जखमी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांनी अटक गोरख उर्फ राजेंद्र नारायण जगताप रा. वडगाव हवेली या संशयितास अटक केली आहे. त्यास पोलिसांनी शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारी दि. ६ रोजीपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कराड : वडगाव हवेली ता. कराड येथे पुर्ववैमनस्यातून दांम्पत्याला सुरीने मारहाण करुन जखमी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांनी अटक गोरख उर्फ राजेंद्र नारायण जगताप रा. वडगाव हवेली या संशयितास अटक केली आहे. त्यास पोलिसांनी शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारी दि. ६ रोजीपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुमन भीमराव तुळसणकर (वय ६०) रा. वडगाव हवेली यांनी याबाबत कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी १ डिसेंबर रोजी सुमन या पती भीमराव यांच्यासह रणजीत जगताप यांच्या किराणा दुकानात गेल्या होत्या. दुकानासमोर पूर्ववैमनस्याच्या कारणावरुन गोरख उर्फ राजेंद्र नारायण जगताप-पाटील याने सुरीने सुमन यांचे पती भीमराव दादासो तुळसणकर यांना डोक्यात मारहाण केली. तर सुमन यांना धक्काबुक्की, शिवागाळ व मारहाण केली. यामध्ये तुळसणकर दांम्पत्य जखमी झाले.
याबाबत सुमन यांनी फिर्याद दिल्यानंतर कराड ग्रामीण पोलिसांनी गोरख जगताप यास अटक केली. त्यास शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारी ६ रोजीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.