मालगाव (ता.सातारा) येथे भरचौकात एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन अजित विजयसिंह कदम याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : मालगाव (ता.सातारा) येथे भरचौकात एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन अजित विजयसिंह कदम याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित महिला ही कोरेगाव तालुक्यातील असून त्या कामानिमित्त मालगाव (ता.सातारा) येथे गेल्या होत्या. त्यावेळी संशयित हा लहान मुलांची खेळणी विस्कटून पुढे निघाला होता. त्यावेळी पीडित महिलेने संशयिताला ‘खाली पाहून जा’ असे सांगितल्याने चिडलेल्या संशयिताने पीडितेचा विनयभंग केला. भर बाजारपेठेत घडलेल्या या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


