क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या 15 वार्डसह बाह्य रुग्ण विभागाचा आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिसन पवार यांनी राऊंड घेतला. यावेळी रुग्णांशी चर्चा करून त्यांना काय सुविधा मिळतात, याची त्यांनी माहिती घेतली. राऊंड नंतर झालेल्या आढावा बैठकीतही प्रशासकीय कामकाजाच्या त्यांनी सविस्तर सूचना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केल्या.
सातारा शहरातील सुप्रसिद्ध येसूबाई फाउंडेशन व जिज्ञासा मंच यांच्या संयुक्त उपक्रमाने दिवाळीनिमित्त सामूहिक आणि वैयक्तिक अशा दोन गटांमध्ये राजधानी सातारा किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
सातारा शहरातील पंताचा गोट व पाटखळ ता. सातारा येथील दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल केला.
रात्रगस्तीसाठी असलेल्या पोलिस अधिकारी यांच्यासह पोलिस कर्मचार्याना दोघांनी शिवीगाळ, दमदाटी करत शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
कराड-उंडाळे रोडवर काले गावच्या हद्दीत डाळिंबीची बाग या ठिकाणी रस्ता क्रॉस करणाऱ्या दुचाकीची व एसटीची धडक होऊन दुचाकी वर पाठीमागे बसलेल्या एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
वरुड, ता खटाव येथील शेतात छापा कारवाई करून आनंद पोलीस सनी तब्बल २ लाख ४ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या अभिनव उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यामधील सर्व पोलीस अधिकारी व सर्व पोलीस अंमलदार तसेच लिपीक व शिपाई यांचे सेवापट ई-सर्व्हिस शीट पोर्टलच्या माध्यमातुन संगणक अगर मोबाईलवर पाहता येणार आहे.
पोदार इंटरनॅशनल स्कूल सातारा तर्फे जगातील टॉप टेन ़फुटबॉंल फ्रीस्टाईलर पैकी एक जेमी नाईट यांना शाळेत निमंत्रित करण्यात आले होते. जेमी नाईट यांच्या नावे अनेक गिनीज बुक विक्रम आहेत, त्यांनी सातार्याला प्रथम भेट दिली.
ओबीसीमधून राज्यातील मराठा समाजबांधवाना सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या धारदार लढाईला सातारा जिल्ह्यातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने सातारा जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंदला जिल्ह्यातून अत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.
विषारी औषध प्राशन केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद मेढा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.