मेढा पोलिसांनी दोन दारू अड्ड्यांवर छापे मारून सुमारे 2870 रुपये किंमतीची दारू जप्त केली आहे.
सातारा : मेढा पोलिसांनी दोन दारू अड्ड्यांवर छापे मारून सुमारे 2870 रुपये किंमतीची दारू जप्त केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 रोजी बिभवी, ता. जावली गावच्या हद्दीतील पेट्रोल पंपा समोर असलेल्या माऊली हॉटेलच्या आडोशाला संतोष बबन लोखंडे रा. मेढा, ता. जावली हा अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून सतराशे पन्नास रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
दुसऱ्या घटनेत कुडाळ, ता. जावली हद्दीमध्ये संतोष रामचंद्र कांबळे रा. कुडाळ, ता. जावली याच्याकडून 1120 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.


