सोनगाव संमत निंब ता.सातारा येथे सुरु असलेल्या अवैध वाळू उपशावर सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 41 लाख 20 हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
रीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरिया खताच्या विक्रीत अनियमीतता केल्याचे निदर्शनास आल्याने तसेच जादा दराने डिएपी खताची विक्री केल्याने आणि खताची विक्री करताना पॉस मशिनचा वापर न करणे, पॉस मशिनवरील साठा व प्रत्यक्ष साठा, नोंदवहीतील साठा न जुळणे, शेतकऱ्यांना योग्य प्रकारे बिले न देणे यामुळे जिल्ह्यातील 11 दुकानांचे विक्री परवाने निलंबीत करण्यात आले आणि एका खत विक्रेत्याचा कायमस्वरुपी परवाना रद्द करण्यात आला आहे
अवैध पद्धतीने कर्जवसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, कर्जदारांच्या तक्रारींची दखल घ्यावी, असे निर्देश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले.
खरीप हंगामातील प्रमुख पिकांची पेरणी करण्यापूर्वी माती परिक्षण, बिजउगवण क्षमता चाचणी, बियाणे बदल, बिज प्रक्रिया व बी बी एफ द्वारे पेरणी या तंत्रज्ञानाच्या बाबींचा काटेकोरपणे वापर केल्यास उत्पानात ४० % नी वाढ होते असे प्रतिपादन तालुका कृषि अधिकारी खटाव राहुल जितकर यांनी खटाव येथे खरीपहंगामपूर्व बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना केले.
सातारा शहराच्या पूर्वेला असणाऱ्या गोडोली परिसरातील साईबाबा मंदिर ते अण्णासाहेब कल्याणी विद्यालय व गोडोली जकात नाका परिसर दरम्यानच्या अतिक्रमणांवर बुधवारी कारवाई करण्यात आली. अतिक्रमण हटाव विभागाने या कारवाईमध्ये पाच टपर्या आणि तीन हातगाड्या उचलून येथील रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला आहे.
सातारा पालिकेच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम रंगकर्मींसाठी राज्यस्तरीय कैलासवासी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा शुक्रवार दिनांक 27 ते रविवार दिनांक 29 मे रोजी पालिकेच्या छत्रपती शाहू कला मंदिर येथे होणार आहेत.
सहा तासाच्या आत सोनू सूद फाउंडेशन च्या माध्यमातून कोरोनाची लस तातडीने उपलब्ध करून देतो असे सांगून एकाने 78 हजार 160 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार साताऱ्यामध्ये घडला आहे. या प्रकरणी रविकिरण श्रीरंग शिंदे वय 63 राहणार कोयना सन्मित्र हौसिंग सोसायटी गोळीबार मैदान यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दिली आहे.
वर्ये तालुका सातारा येथे पत्र्याच्या शेड मधून 75 हजाराचे लोखंडी साहित्य अज्ञाताने लांबवल्याची घटना दिनांक 19 मे रोजी रात्री साडेबारा ते 23 मे दुपारी साडेबारा या दरम्यान घडली. याप्रकरणी मंगेश अरुण जाधव वय 44 राहणार वर्ये, तालुका- जिल्हा सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गोडोली परिसरातील अजंठा चौक येथे निळ्या रंगाची हिरो होंडा दुचाकी चोरी होण्याची घटना दिनांक 12 मे रोजी घडली आहे. सकाळी साडेदहाच्या दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला. याप्रकरणी अमोल सुभाष काशीद वय 32 राहणार गोविंद नगर संभाजीनगर कोडोली यांनी फिर्याद दिली आहे.
सतरा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या माण तालुक्यातील एकावर दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोक्सो अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.