maharashtra

वर्ये येथे पत्र्याच्या शेड मधुन 75 हजाराचे साहित्य चोरीस


Items of 75,000  stolen from a tin shed at Varye
वर्ये तालुका सातारा येथे पत्र्याच्या शेड मधून 75 हजाराचे लोखंडी साहित्य अज्ञाताने लांबवल्याची घटना दिनांक 19 मे रोजी रात्री साडेबारा ते 23 मे दुपारी साडेबारा या दरम्यान घडली. याप्रकरणी मंगेश अरुण जाधव वय 44 राहणार वर्ये, तालुका- जिल्हा सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सातारा : वर्ये तालुका सातारा येथे पत्र्याच्या शेड मधून 75 हजाराचे लोखंडी साहित्य अज्ञाताने लांबवल्याची घटना दिनांक 19 मे रोजी रात्री साडेबारा ते 23 मे दुपारी साडेबारा या दरम्यान घडली. याप्रकरणी मंगेश अरुण जाधव वय 44 राहणार वर्ये, तालुका- जिल्हा सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दाखल फिर्यादीनुसार फिर्यादी यांचे वर्वे सातारा रस्त्यावर रस्त्याच्या कडेला पत्र्याचे मोठे शेड आहे. या शेडच्या कंपाऊंड मधून अज्ञाताने पत्र्याची पाने, गेट, खिडक्या, लोखंडी ग्रील, अँगल, काँक्रीट मिक्सर व लाकडी मुंडे असे 75,008 चे साहित्य चोरून नेले. मंगेश जाधव हे गावावरून परत आले असता त्यांना आपल्या कंपाऊंड शेडमध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. सहाय्यक फौजदार s.s. बागवान अधिक तपास करत आहेत.