सहा तासाच्या आत सोनू सूद फाउंडेशन च्या माध्यमातून कोरोनाची लस तातडीने उपलब्ध करून देतो असे सांगून एकाने 78 हजार 160 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार साताऱ्यामध्ये घडला आहे. या प्रकरणी रविकिरण श्रीरंग शिंदे वय 63 राहणार कोयना सन्मित्र हौसिंग सोसायटी गोळीबार मैदान यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दिली आहे.
सातारा : सहा तासाच्या आत सोनू सूद फाउंडेशन च्या माध्यमातून कोरोनाची लस तातडीने उपलब्ध करून देतो असे सांगून एकाने 78 हजार 160 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार साताऱ्यामध्ये घडला आहे. या प्रकरणी रविकिरण श्रीरंग शिंदे वय 63 राहणार कोयना सन्मित्र हौसिंग सोसायटी गोळीबार मैदान यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दिली आहे. हा प्रकार 19 जानेवारी 2020 च्या ते 23 मे 2022 पर्यंत घडल्याची फिर्यादीची तक्रार आहे
अज्ञात आरोपीने फिर्यादीशी संपर्क करून त्यांना सोनू सूद फाउंडेशन व तसेच डॉक्टर एम राकेश यांच्या ट्विट अकाउंट ची माहिती दिली आणि सहाशे एमजी ची इंजेक्शनची विचारणा केली. आरोपीने तुम्हाला 78 हजार 160 रुपये भरावे लागतील. ते भरताच मी तुम्हाला सहा तासात इंजेक्शन घरपोच करतो, असे सांगितले. फिर्यादी यांनी त्यासंदर्भात पैशाची पूर्तता केली. मात्र त्यांना इंजेक्शन प्राप्त झाले नाही. म्हणून शिंदे यांच्या फिर्यादीवरून सातारा शहर पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञातांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार भवारी तपास करत आहेत.


