गोडोली परिसरातील अजंठा चौक येथे निळ्या रंगाची हिरो होंडा दुचाकी चोरी होण्याची घटना दिनांक 12 मे रोजी घडली आहे. सकाळी साडेदहाच्या दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला. याप्रकरणी अमोल सुभाष काशीद वय 32 राहणार गोविंद नगर संभाजीनगर कोडोली यांनी फिर्याद दिली आहे.
सातारा : गोडोली परिसरातील अजंठा चौक येथे निळ्या रंगाची हिरो होंडा दुचाकी चोरी होण्याची घटना दिनांक 12 मे रोजी घडली आहे. सकाळी साडेदहाच्या दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला. याप्रकरणी अमोल सुभाष काशीद वय 32 राहणार गोविंद नगर संभाजीनगर कोडोली यांनी फिर्याद दिली आहे.
संबंधित फिर्यादी काही कामानिमित्त ते अजंठा चौकात गेला असता दुकानात जाण्यासाठी त्याने अजिंठा चौकातील पुलाच्या खाली गाडी लावली होती. हिरो होंडा पॅशन नावाची मोटरसायकल अज्ञाताने चोरून नेली. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार दगडे करीत आहेत. सातारा शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


