थकित मानधन, शासकीय सेवेत समायोजन, बदली धोरण यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये पुरुष तसेच महिला आरोग्य कर्मचारी सहभागी झाले आहेत.
नगरपरिषद संचालनालयाच्या अधीक्षक अभियंता पल्लवी सोनवणे यांनी मंगळवारी कास धरण उंचीच्या कामाची पाहणी केली. तसेच प्रस्तावित आराखड्यानुसार सुरू असलेल्या कामाची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
मंत्री छगन भुजबळ यांनी बेताल वक्तव्य करुन मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे. त्यांच्यावर सरकारच्यावतीने सुमोटो गुन्हा दाखल करावा. ते ज्या पक्षात आहेत, त्या पक्षानेही त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि सातारचे डीवायएसपी किरणकुमार सुर्यवंशी यांच्याकडे सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली आहे.
मावळ्यांच्या ज्वलंत इतिहासाची साक्ष असलेले महाराष्ट्रातील गड किल्ले हे सर्वच मावळ्यांचे श्रद्धास्थान आहेत.
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे मोठ्या उत्साहात शाळा प्रवेश दिन संपन्न झाला. यादरम्यान समता सैनिक दालाच्या वतीने बिगूल वाजवून मानवंदनाही देण्यात आली.
शिवराज्याभिषेक दिनाच्या साडेतीनशेव्या सोहळ्यानिमित्त खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने भव्य ऐतिहासिक किल्ले स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन अज्ञातांनी पाण्याच्या मोटरची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
पोलीस असल्याचे सांगून वृद्धेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन भामट्यांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.