नवीन एमआयडीसी येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : नवीन एमआयडीसी येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, झेंडा चौक, नवीन एमआयडीसी, सातारा येथून अज्ञात चोरट्याने एमएच 11 सीझेड 0644 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. 31 ऑक्टोबर रोजी घडली असून याप्रकरणी यशोदीप ओमप्रकाश रामावत (रा.देगाव रोड,सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.


