तलवारीने दहशत माजवल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : तलवारीने दहशत माजवल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गैरसमज करुन तलवार आणून दहशत माजवत शिवीगाळ केल्याप्रकरणी अनिल भोसले याच्या विरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सुधीर यशवंत काकडे (वय 50, रा. सदरबझार, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. 6 नोव्हेबर रोजी सदरबझार येथे घडली आहे. ’मुलाला बोलल्याच्या कारणातून गैरसमजूतीने चिडून’ असे कृत्य केले असल्याचे तक्रारीत म्ह्टले आहे.


