एमआयडीसी येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करुन सुमारे 70 हजारांचा ऐवज लंपास केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : एमआयडीसी येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करुन सुमारे 70 हजारांचा ऐवज लंपास केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एमआयडीसी येथून रोख 63 हजार 500 रुपये, शिलाई मशीन व पाण्याची मोटर असा एकूण 70500 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी झाला. याप्रकरणी शकील नजीर शेख (वय 38, रा.संभाजीनगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 29 ऑक्टोबर रोजी घडली आहे.


