महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

अमरनाथ यात्रेतील सातारकर सुरक्षित

अमरनाथ येथे दोन दिवसांपूर्वी अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली. यामध्ये असंख्य लोक अडकले. त्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून बचावकार्य सुरु आहे. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमातून प्रसारित होताच अनेकांनी या जम्मू-काश्मिर येथील अमरनाथ यात्रेसाठी गेलेले सातारकर यांच्याशी मोबाईलवरुन थेट संपर्क साधला. त्यावेळी सर्वजण सुरक्षित असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा जिल्ह्याच्या 6 तालुक्यात भीषण पाणी टंचाई

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. याचबरोबर सातारा जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर, पुर्वेकडे पावसाने पाठ फिरवली आहे. असे असतानाही ऐन पावसाळ्यात माण, वाई, पाटण, जावली, सातारा व कराड तालुक्यातील 16 गावे व 39 वाड्यावस्त्यांमध्ये पाणी टंचाई जाणवत आहे.

esahas.com
महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा

आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे  सकारात्मक वातावरण तयार होते. अशा वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यात राज्य शासन कोठे ही कमी पडणार नसल्याची ग्वाही  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

esahas.com
महाराष्ट्र

खटाव तालुक्यातील विसापूर येथे घडले दुहेरी हत्याकांड

तालुक्यातील विसापूर गावात एका 70 वर्षीय हनुमंत भाऊ निकम व कमल हनुमंत निकम वय 65 या पती-पत्नीचा खून झाला असल्याची भयंकर घटना घडल्याने खटाव तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. या दुहेरी हत्याकांडाची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

साताऱ्यात भामट्यांचा मायलेकींना गंडा

दागिने साफ करण्याच्या बहाण्याने मायलेकींना दोघा भामट्यांनी ७० हजार रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले. दोघा चोरट्यांनी हातचलाखी करून दागिने स्वतःजवळ ठेवले. त्या बदल्यात त्यांनी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दगड भरून मायलेकींच्या हाती दिले. ही खळबळजनक घटना साताऱ्यातील चिमणपुरा पेठेमध्ये घडली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

दोन वेगवेगळ्या अपघात प्रकरणी दोघांवर गुन्हा

सातारा शहर परिसरात दोन वेगवेगळ्या अपघात प्रकरणी दोन जणांवर सातारा तालुका व शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

बनावट चेक देऊन वस्तू खरेदी करणारा भामटा जेरबंद

बनावट चेक देऊन वस्तू खरेदी करणारा भामटा विश्रुत भालचंद्र नवाथे, रा. शनिवार पेठ, सातारा याला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.

esahas.com
महाराष्ट्र

चोऱ्या, फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश

सातारा जिल्ह्यात डोकेदुखी ठरलेली परराज्यातील बनावट सोने विकणाऱ्या भामट्यांच्या टोळीला कराड पोलिसांनी गजाआड केले. कोणताही पुरावा नसताना केवळ भामट्यांचा अंदाज आल्याने, टोळी गजाआड झाली. त्यांच्याकडून बारापेक्षाही जास्त फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आले.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

सातारा शहराजवळील आणि कास पठाराचे सानिध्य लाभलेला देशातील सर्वात उंच असलेला भांबवली वजराई धबधबा पुन्हा एकदा फेसाळून कोसळू लागला आहे. सकाळी सातारा शहरासह जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने थोडी उघडीप दिली तरी पश्चिम भागात मात्र दिवसभर पावसाने जोर पकडला होता.

esahas.com
महाराष्ट्र

वेण्णा तलाव तुडुंब भरला; सांडव्यावरून वाहू लागले पाणी

महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास सांडव्यावरून पाणी वाहू लागले.