सातारा शहर परिसरात दोन वेगवेगळ्या अपघात प्रकरणी दोन जणांवर सातारा तालुका व शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : सातारा शहर परिसरात दोन वेगवेगळ्या अपघात प्रकरणी दोन जणांवर सातारा तालुका व शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.६ जुलै रोजी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सातारा- लोणंद मार्गावर वाढे गावच्या हद्दीत ट्रक क्रमांक एम.एच.०९ - ९९४९ वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ट्रक चालवून दुचाकी चालक विनोद चंद्रकांत भोसले रा. आरळे, ता. सातारा याला अपघातात जखमी केल्याची तक्रार गणेश रघुनाथ कांबळे रा. करंजे, सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.
दुसऱ्या घटनेत दि.४ जुलै रोजी दहा वाजण्याच्या सुमारास करंजे नाका सातारा हद्दीत अज्ञात कार मधील चालकाने सायकलस्वार विश्वास प्रभाकर देवरुखकर, रा तामजाई नगर, सातारा यांच्या सायकलला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते जखमी झाले. याप्रकरणी अज्ञात कारचालकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


