maharashtra

पुसेगाव येथे एसटी व मोटरसायकलच्या धडकेत एक जण ठार


One killed in ST and motorcycle collision at Pusegaon
पुसेगाव कडून दहिवडी कडे जाणाऱ्या एसटी क्रमांक एम एच 07 सी 9093 एसटीने चुकीच्या दिशेला जाऊन मोटरसायकलला धडक देऊन मोटर सायकल वरील सुरज जगताप वय 40, मुळगाव पांगरखेल, सध्या रा. पुसेगाव, तालुका खटाव, यास जोरदार धडक दिल्याने सुरज जगताप हा गंभीर जखमी झाला. पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता, वैद्यकीय अधिकारी पुसेगाव यांनी त्यास मयत घोषित केले. सदर घटनेची नोंद पुसेगाव पोलीस स्टेशनला झाली आहे.

पुसेगाव : पुसेगाव पब्लिक स्कूल गेट शेजारी पुसेगाव चे हद्दीत सेवागिरी पेट्रोल पंपाचे बाजू कडून पुसेगाव बाजूकडे जाणारी बजाज कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच 11 डीइ 8747 ला पुसेगाव कडून दहिवडी कडे जाणाऱ्या एसटी क्रमांक एम एच 07 सी 9093 एसटीने चुकीच्या दिशेला जाऊन मोटरसायकलला धडक देऊन मोटर सायकल वरील सुरज जगताप वय 40, मुळगाव पांगरखेल, सध्या रा. पुसेगाव, तालुका खटाव, यास जोरदार धडक दिल्याने सुरज जगताप हा गंभीर जखमी झाला. पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता, वैद्यकीय अधिकारी पुसेगाव यांनी त्यास मयत घोषित केले. सदर घटनेची नोंद पुसेगाव पोलीस स्टेशनला झाली आहे.
पोलीस स्टेशनच्या मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री नऊ वाजून 55 मिनिटाचे सुमारास पुसेगाव, ता. खटाव गावचे हद्दीत राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ पेट्रोल पंपाकडून पुसेगाव कडे मोटरसायकल वरून जाणारा सुरज जगताप वय 40 वर्षे यास पुसेगाव बाजूकडून दहिवडी बाजूकडे जाणारी एसटी चालक आनंदराव तुकाराम बोराडे राहणार बिदाल,तालुका माण जिल्हा सातारा यांनी त्याच्या ताब्यातील एसटी ही रोडचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून समोरून येणारा मोटर सायकलस्वार सुरज जगताप वय 40 वर्षे यास रॉंग साईडला जाऊन जोरात धडक दिली. त्यात सुरज जगताप याचा मृत्यू झाला. त्यामुळे गंभीर दुखापती व मरणास कारणीभूत होऊन मोटरसायकलचे नुकसानीस कारणीभूत झाल्याने एसटी चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची नोंद पुसेगाव पोलीस स्टेशनला झाली आहे.