onekilledinstandmotorcyclecollisionatpusegaon

esahas.com

पुसेगाव येथे एसटी व मोटरसायकलच्या धडकेत एक जण ठार

पुसेगाव कडून दहिवडी कडे जाणाऱ्या एसटी क्रमांक एम एच 07 सी 9093 एसटीने चुकीच्या दिशेला जाऊन मोटरसायकलला धडक देऊन मोटर सायकल वरील सुरज जगताप वय 40, मुळगाव पांगरखेल, सध्या रा. पुसेगाव, तालुका खटाव, यास जोरदार धडक दिल्याने सुरज जगताप हा गंभीर जखमी झाला. पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता, वैद्यकीय अधिकारी पुसेगाव यांनी त्यास मयत घोषित केले. सदर घटनेची नोंद पुसेगाव पोलीस स्टेशनला झाली आहे.