सातारा शहरालगत असणार्या दत्तनगर कोडोली येथे अष्टविनायक कॉलनीमध्ये घरगुती वादातून सख्ख्या चुलत्याने केवळ दहा महिन्यांच्या भावाच्या मुलाला विहिरीत टाकून त्याचा खून केला. ही धक्कादायक घटना शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. शाल्मोन मयूर सोनवणे असे या दुर्दैवी बाळाचे नाव आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांपेक्षा मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढत आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले विद्यार्थ्यांनी उच्चपदावर गवसणी घातल्याचे आपण पाहतो. विलासपूर शाळेचा पट चांगला आहे. या शाळेला भौतिक सुविधा देण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू, अशी ग्वाही युवा नेते संग्राम बर्गे यांनी दिली.
आमदार जयकुमार गोरे शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. सालकुटे यांच्यापुढे शरण आले. त्यानंतर त्यांच्या जामिनावर सुनावणी सुरु झाली. न्यायालयाने 11 ऑगस्टपर्यंत अंतरिम जामीन दिल्याने तुर्तास त्यांची अटक टळली आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी 11 ऑगस्ट रोजी होणार आहे.
सुनेला बाहेर का जातेस, म्हणून घरात डिझेलने पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भिलार येथे सासू, सासरा व नवऱ्याविरोधात पांचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
गेंडामाळ झोपडपट्टी, सातारा येथील वैभव उर्फ बबन लोंढे याचा पुणे जिल्ह्यातील भोर, ता. वेळू गावानजीक दुचाकीचा अपघात झाला असुन त्यात तो गंभीर जखमी झाला. या अपघातात त्याची पत्नीही जखमी झाली आहे. वैभववर वेळू गावातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
येथील कल्याणी शाळेसमोर असणाऱ्या गार्डन परिसरात चाकु बाळगल्या प्रकरणी एका युवकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. निखिल रामदास दुर्वे, वय १९, रा. गुरुवार पेठ, सातारा असे त्याचे नाव आहे.
लग्नाचे आमिष दाखवून सातारा शहर परिसरात असणाऱ्या एका उड्डाण पुलाखाली परप्रांतीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ऍप्पे रिक्षा बॅटरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत ३५ हजार रुपये किमतीच्या बॅटरीसह एक दुचाकी हस्तगत करण्यात यश मिळवले.
लग्नाचे अमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सागर बलभीम कांबळे, वय २४, रा. लक्ष्मीटेकडी झोपडपट्टी, सदरबझार, सातारा याला न्यायालयाने पोक्सो अंतर्गत दोषी ठरवून ७ वर्षे सक्तमजुरी व ३ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
देशातील बेरोजगारी आणि महागाई विरोधात सातारा जिल्हा काँग्रेसने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी भाकरी थापल्या. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.