maharashtra

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार


लग्नाचे आमिष दाखवून सातारा शहर परिसरात असणाऱ्या एका उड्डाण पुलाखाली परप्रांतीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सातारा : लग्नाचे आमिष दाखवून सातारा शहर परिसरात असणाऱ्या एका उड्डाण पुलाखाली परप्रांतीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १ जानेवारी २०२१ ते दि. ४ ऑगस्ट २०२२ दरम्यान सातारा शहर परिसरात असणाऱ्या एका उड्डाण पुलाखाली झोपडी टाकून वास्तव्य करीत असणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला इंदू कालाजी मारण, मूळ रा. राजस्थान,  सध्या रा. बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाण पुलाखाली, सातारा याने लग्नाचे अमिष दाखवून तिला जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडुन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. त्यामध्ये ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहून तिला मुलगी झाली असल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत इंदू कालाजी मारण याच्यावर बाललैंगिक अत्याचार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.