सातारा जिल्ह्यातून चार वेगवेगळ्या ठिकाणाहून चार जण बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी जलमंदिर येथे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व राजमाता कल्पनाराजे भोसले यांची भेट घेऊन सुमारे एक तास विविध विषयांवर चर्चा केली.
सह्याद्री देवराईने राबवलेली वृक्ष चळवळ साताऱ्याचे पर्यावरण संतुलन समृद्ध करण्याचे काम करत आहे. वेगवेगळ्या जातीचे वृक्ष येथे जोपासले जात आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. अशा वृक्ष चळवळी पर्यावरण क्षेत्रात नवीन मापदंड तयार करतील, अशी अपेक्षा कूपर इंडस्ट्रीजचे संचालक फरोख कूपर यांनी व्यक्त केली.
आज आपण खुर्चीत बसतोय, पण उद्या वाडगे घेवून बसणार. तेव्हा अशी अवस्था तुमची, तुमच्या भावी पिढीची करायची आहे का ? असा सवाल भाजपचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही.
साताऱ्यात एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीत शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सेंट पॉल ग्राउंड च्या समोर पार्क केलेल्या दुचाकीची अज्ञाताने चोरी केली असल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.