एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक २५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता सुमारास भीमराव शिवाजी शेंडे रा. आंधळी, तालुका माण यांना काही कारण नसताना तेथीलच मल्हारी सत्यवान चव्हाण आणि लाला चव्हाण यांनी लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सहाय्यक फौजदार पी.जी. हांगे अधिक तपास करीत आहेत.


