maharashtra

महिलेला शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी हनुमानवाडी येथील दोघांवर गुन्हे


उंब्रज, ता. फलटण येथील एका महिलेला शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी दोघांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : उंब्रज, ता. फलटण येथील एका महिलेला शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी दोघांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  दि. ७ ऑक्टोंबर रोजी १२ वाजण्याच्या सुमारास उंब्रज बाजारपेठ, ता. कराड येथे समीर गायकवाड रा. उचले गल्ली, उंब्रज, ता. कराड यांनी बीबी बाबासाहेब शेख वय ६२, रा. आदर्श शाळेजवळ, उंब्रज ता. कराड यांना येथे दुकान लावू नको असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी केली. सुमित शामराव लकिरे रा. हनुमानवाडी,  ता. कराड याने बेबी शेख यांचा मुलाला शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.