सातारा परिसरात असणाऱ्या चंदन नगर, (कोडोली) ता. सातारा येथून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे तीन लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : सातारा परिसरात असणाऱ्या चंदन नगर, (कोडोली) ता. सातारा येथून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे तीन लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ६ ऑक्टोंबर रोजी ११.४५ ते ६ वाजण्याच्या सुमारास चंदन नगर येथील पुष्पकुंज रेसिडेन्सी येथील एका फ्लॅटच्या दरवाजाबाहेर असलेल्या चप्पल स्टॅन्डमधील शूज मध्ये ठेवलेली चावी काढून अज्ञात चोरट्याने फ्लॅटमध्ये प्रवेश केला. आतील बेडरूममध्ये असणाऱ्या लोखंडी कपाटावरील २ लाख ९४ हजार ८०० रुपये किमतींच्या सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार भगवान शामराव पाटील यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली.


