maharashtra

कराड शहरातून दुचाकीची चोरी


कराड शहर परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केली असल्याची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : कराड शहर परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केली असल्याची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहरातील बुरुड गल्ली, शनिवार पेठ येथे राहत्या घराजवळ रस्त्यावर पार्क केलेली जनार्दन महादेव शिंदे वय 58 यांची दहा हजार रुपये किंमतीची होंडा कंपनीची दुचाकी क्रमांक एमएच 11 एक्यू 6944 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पोलीस नाईक पवार अधिक तपास करीत आहेत.