maharashtra

फलटण येथून ११ लाख ५० हजार रुपयांची रक्कम चोरीस


फलटण, ता. फलटण येथून अज्ञात चोरट्याने चारचाकी कारची पाठीमागील काच तोडून १२ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : फलटण, ता. फलटण येथून अज्ञात चोरट्याने चारचाकी कारची पाठीमागील काच तोडून १२ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  दि. ७ रोजी ११.३० ते ११.४० वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनगर, फलटण येथील होम डेकोर कार्यालय मार्गावर पार्किंग केलेली चारचाकी क्रमांक एम.एच. ११ सीएच ०७७७ ची पाठीमागील काच फोडून अज्ञात चोरट्याने पाठीमागील सीटवर असलेल्या तनिष्क ज्वेलर्स खाकी रंगाच्या कापडी पिशवीमध्ये ठेवलेले ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार प्रवीण गोविंद कोल्हे रा.धुळदेव, ता. फलटण यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.