नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराची ज्या पद्धतीने आधीच तयारी करता, तशीच तयारी करून वाट न पाहता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कामाला लागा, अशा सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा शहरातील सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडी व भाजपच्या आजी माजी पदाधिकार्यांना केल्या.
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने नितीन जाधव पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना शह दिला. जिल्हा बँकेचं अध्यक्षपद मिळावं यासाठी शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेटही घेतली होती. मात्र शिवेंद्रराजेंची रणनीती अयशस्वी झाली आणि राष्ट्रवादीने आपल्याच पक्षातील व्यक्तीकडे अध्यक्षपद देणं पसंत केलं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजेंना टोला लगावत जोरदार फटकेबाजी केली आहे.
प्रोफेशनल फोटोग्राफर शिवाय कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला शोभा नाही. फोटोग्राफर संघटनेच्या नेहमीच पाठीशी राहीन असे आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.
अजिंक्यतारा साखर कारखाना आणि सूत गिरणीने सहकारामध्ये एक अढळ स्थान निर्माण केलेले आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून या दोन्ही संस्थांचे काम प्रगतीपथावर नेले आहे.
देशातील एक आदर्श बँक असा नावलौकिक असलेल्या बँकेवर संचालकपदाच्या हव्यासापोटी तथ्यहीन आणि बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. सवंग लोकप्रियतेसाठी बँकेवर आरोप करणाऱ्यांच्या फसवेगिरीला मतदार थारा देणार नाहीत. मी संघर्षातून वर आलो आहे. संघर्ष मला नवीन नाही.
सातारा : वाढीव निधी मिळत नसल्याने सातारकरांचा कास धरणाच्रा उंची वाढवण्याच्या कामाला ब्रेक लागला होता. मात्र, ज्या ना. अजित पवारांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीवरून प्रकल्पाला मंजुरी दिली होती त्याच ना. पवारांनी आज पुन्हा आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याच मागणीवरून कास धरण प्रकल्पासाठी वाढीव ५७ कोटी निधी देण्यासाठी मान्यता दिली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनु...