जिल्ह्यातील डोंगरी भागात जास्त पाऊस होतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने त्यांचे तात्पुरते स्थलांतर शाळांमध्ये करा. याबरोबरच सर्व विभागांनी संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस सातारा स्थानिक गुन्हे शाखा, सातारा तालुका पोलीस, सातारा शहर पोलीसांनी तपास करुन तातडीने अटक केली. त्याबद्दल या तिन्ही पोलीस पथकास गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज त्यांच्या निवासस्थानी बोलावून त्यांचे विशेष कौतुक केले.
विद्यार्थींनींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयुट ऑफ सायन्स व छत्रपती शिवाजी महाविद्यालय परिसराला अचानक भेट देऊन पाहणी करुन सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थीनींशी संवाद साधला.
राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे तत्पर व धाडसी तसेच तातडीने मदतीला धावून जाणारे मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. मग तो प्रसंग कोणताही असो. अडचणीच्या काळी ना.शंभूराज देसाई हे मदतीला नेहमी धावून जातात याचा अनेकदा प्रत्यय आला असून असाच अपघाताचा प्रसंग काल मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली येथे घडला.
पळसावडे, ता. सातारा येथील माजी सरपंच रामचंद्र जानकर याने गर्भवती महिला वनरक्षकाला केलेली मारहाणीची घटना ही अमानवीय अशीच आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, राज्याचे गृह विभाग आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई भाष्य करायला तयार नाहीत. त्यावरुन ते आपली जबाबदारी झटकत आहेत, हे स्पष्ट होत असून याप्रकरणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राजीनामा द्यावा
सातारा : सह्याद्री देवराई संस्थेला पोलीस दलाच्या जागेत झाडे लावण्याची परवानगी नाकारल्याची बातमी सर्वत्र फिरत असताना सरकार खडबडून जागं झालं आहे. सह्याद्री देवराई संस्थेचा उपक्रम अतिशय चांगला असून याबाबतच्या अडचणी सोडवल्या जातील, असं आश्वासन गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिलं आहे.पोलीस अधीक्षकांची परवानगी असताना तसेच विभागीय आयुक्तांचा होकार असताना एवढंच नाही तर उप...