गोव्राची खाद्यपरंपरा ही अनेक खाद्यपरंपरांचे चविष्ट मिश्रण म्हणता रेईल. रामध्रे कोकणी पदार्थ आहेत, पोर्तुगीजांकडून आलेले पारंपारिक पदार्थही आहेत. त्रातून गोव्राला प्रचंड सागरी किनार्रांचे वरदान असल्राने सागरी खाद्यही रा खाद्यसंस्कृतीचा अविभाज्र भाग आहे
गोव्राची खाद्यपरंपरा ही अनेक खाद्यपरंपरांचे चविष्ट मिश्रण म्हणता रेईल. रामध्रे कोकणी पदार्थ आहेत, पोर्तुगीजांकडून आलेले पारंपारिक पदार्थही आहेत. त्रातून गोव्राला प्रचंड सागरी किनार्रांचे वरदान असल्राने सागरी खाद्यही रा खाद्यसंस्कृतीचा अविभाज्र भाग आहे. राच खाद्यसंस्कृतीच्रा आगळ्रा वेगळ्रा खासिरतींची ओळख करू घेऊ रा. अतिशर मेहनतीने आणि कौशल्राने तरार केले जाणारे ‘बिबिंका’, हे गोव्राचे खास, केकप्रमाणे दिसणारे मिष्टान्न आहे. हे मिष्टान्न मूळचे पोर्तुगीजांकडून आलेले. हा पदार्थ बनविताना एकावर एक असे पीठाचे थर घालून, ते शिजवून हा पदार्थ तरार केला जातो. बिबिंकामध्रे सर्वसाधारणपणे पाच ते पंधरा, किंवा त्राहूनही अधिक थर असतात. गोव्राच्रा बहुतेक बेकरींमध्रे हा पदार्थ तुम्हाला चाखावरास मिळेल. बिबिंकाच्रा मोठ्याश्रा स्लाईसवर बदामाचे तुकडे आणि त्राची जोडीने थंडगार आईस्क्रीम असले, की रा पदार्थाची लज्जत आणखीनच वाढते.
‘कुल्कुल्स’ हे कुरकुरीत आणि साखरेमध्रे घोळविलेले लहान लहान वडे. हे तरार करणे मोठे जिकीरीचे काम असून, गोव्रातील बहुतेक घरांमध्रे हा पदार्थ परिवारातील बहुतेक सदस्रांच्रा मदतीने बनविला जाणारा आहे. मधल्रा भुकेच्रा वेळी आवडीने खाल्ला जाणारा असा हा काहीसा खारट, काहीसा गोड, अश्रा मिश्र चवीचा पदार्थ आहे. ‘पेराड’ नावाचा खास गोअन पदार्थ पिकलेले पेरू वापरून बनविण्रात रेतो. पेरूचा गर वापरून जे चीझ बनविण्रात रेते त्राला पेराड म्हटले जाते. अतिशर चविष्ट असे ही चीझ लालसर रंगाचे दिसते. रा चीझचा वापर अनेक मिठारांमध्रे केला जातो, तर कधी हे चीझ, टोस्टच्रा जोडीनेही खाल्ले जाते.
नारळाचा वापर करून बनविलेले, बाहेरून कुरकुरीत तर आतून अतिशर मऊ असणारे चविष्ट बिस्कीट ‘बोल्हीना’ रा नावाने ओळखले जाते. बहुतेकवेळी दुपारच्रा चहाच्रा जोडीने बोलीन्हा आपल्रा भेटीला रेतात. नाताळच्रा सणानिमित्त ही बिस्किटे खास बनविली जात असतात. हॉट चॉकोलेट च्रा जोडीने ही बिस्किटे खाल्ली जातात. तसेच रा बिस्किटांवर जॅम लावूनही खाण्राची पद्धत आहे. नारळ, गूळ आणि तांदुळाच्रा पिठाचा वापर करून बनविण्रात रेणारी आणखी एक मिठाई म्हणजे ‘दोदोल’. ही मिठाई दक्षिण-पूर्वेकडील देशांमध्रेही लोकप्रिर आहे. पण गोव्रामध्रे बनविल्रा जाणार्रा रा मिठाईची खासिरत अशी, की रासाठी रेथे खास बनविण्रात रेणार्रा गुळाचा वापर करण्रात रेतो.
‘चोरिझो’ ही अतिशर चविष्ट मसालेदार सॉसेजेस गोव्राची खासिरत आहेत. हा पदार्थ मूळचा स्पेन मधला. पण गोव्रामध्रे बनविल्रा जाणार्रा ‘चोरिझो’ मध्रे अनेक मसाले, लसूण आणि व्हिनेगरचा सढळ हस्ते वापर केला जातो. हे सॉसेजेस आकाराने लहान असून, रा सॉसेजेसची ‘स्ट्रिंग’, म्हणजेच माळ बनविली जाते. एका स्ट्रिंगमध्रे पन्नास ते शंभर सॉसेजेस बांधले जातात, आणि आवश्रकतेनुसार ही सॉसेजेस रा माळेतून कापून घेऊन भाजले जातात. गोव्राच्रा रा सर्व खासिरती, गोव्रामध्रे बहुतेक सर्व ठिकाणी उपलब्ध असून, कधी गोव्राला जाणे झालेच तर आठवणीने बरोबर आणता रेण्रासारख्रा आहेत.


