अनेकदा आपल्यासोबत काही अशा व्यक्ती असतात, ज्या मनातून काही गोष्टिंमुळे किंवा प्रसंगांमुळे अडचणीत सापडलेल्या असतात. एखादी गोष्ट मनात ठेवून ते त्या गोष्टीचा फार विचार करतात. परिणामी अनेकदा अशा व्यक्ती डिप्रेशनला बळी पडतात. डिप्रेशनची समस्या उद्भल्यास तीव्र मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो.
अनेकदा आपल्यासोबत काही अशा व्यक्ती असतात, ज्या मनातून काही गोष्टिंमुळे किंवा प्रसंगांमुळे अडचणीत सापडलेल्या असतात. एखादी गोष्ट मनात ठेवून ते त्या गोष्टीचा फार विचार करतात. परिणामी अनेकदा अशा व्यक्ती डिप्रेशनला बळी पडतात. डिप्रेशनची समस्या उद्भल्यास तीव्र मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. अनेकदा डिप्रेशनच्या भोवर्यात अडकलेल्या व्यक्ती टोकाचं पाऊलही उचलतात. याआधीही डिप्रेशन किंवा मानसिक आजारांना बळी पडून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललेल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनेही आत्महत्या केली असून तो गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे आपल्या सहवासातील अशा व्यक्तींना ओळखून त्यांच्याशी बोलावं. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांना मदत करावी. अशातच आता प्रश्न पडला असेल की, एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे की, नाही. हे कसं ओळखावं? या प्रश्नाचं उत्तर म्हणून आम्ही आज तुम्हाला डिप्रेशनची काही लक्षणं सांगणार आहोत. जाणून घेऊयात.
1. सायकॉलॉजिकल लक्षणांमध्ये व्यक्ती दुःखी आणि सगळ्यांपासून लांब आणि एकटी राहू लागते. या व्यतिरिक्त त्या प्रत्येक गोष्टीत आपलीच चूक असल्याचं सांगू लागतात. 2. तर फिजिकली पाहायचं झालं तर, डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तींना रात्री शांत झोप लागत नाही. त्यामुळे या व्यक्ती थकलेल्या दिसतात. तसेच त्यांचा आवाजही खालावतो. 3. डिप्रेशन किंवा नैराश्यात असलेल्या व्यक्ती सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं टाळतात. त्यांना कुठे जाणं, कोणाशी बोलणं आवडत नाही. ते एकटं राहणं पसंत करतात. 4. या व्यक्ती नेहमी विचारात असतात. त्यांच्या डोक्यात सतत वाईटसाईट विचार येतात, भीती वाटते. 5. डिप्रेशनमध्ये गेलेल्या व्यक्ती मनमोकळेपणाने हसत नाहीत, ते सतत कोणत्यातरी विचारात असतात. त्यांना झोपही लागत नाही. 6. डिप्रेस्ड लोक बर्याचदा नकारात्मक गोष्टींचा विचार करतात. एखाद्या साकारात्मक गोष्टिकडेही ते नकारात्मक पद्धतीने पाहतात. 7. नैराश्यात असणार्या व्यक्ती उगाच गरज नसताना रडतात, त्यांना अशक्तपणा जाणवतो, सतत डोकेदुखीची समस्या होते, ह्रदयाची धडधड वाढणे, अंगाला घाम सुटणे यांसारखी लक्षणं दिसून येतात.