cineworld

विनेश फोगटला सुवर्णपदक

करोना साथीच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने झोकात पुनरागमन केले आहे. रविवारी विनेशने 2017च्या विश्‍वविजेत्या व्ही. कॅलाडझिन्स्कायला नामोहरम करून कीव्ह आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पध्रेचे सुवर्णपदक जिंकले.

जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर असलेल्या विनेशला 53 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या बेलारूसच्या कॅलाडझिन्स्कायने तोलामोलाची लढत दिली. विनेशने सुरुवातीला 4-0 अशी आघाडी घेतली. मग कॅलाडझिन्स्कायने 4-4 अशी बरोबरी साधली. मग विनेशने पुन्हा 6-4 अशी आघाडी घेतली. कॅलाडझिन्स्कायने दडपण वाढवत चार गुणांची कमाई करीत पुन्हा आगेकूच केली. पण विनेशने चार गुणांची कमाई करीत 10-8 अशा फरकाने लढतीवर वर्चस्व गाजवले.