‘जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कोणताही रुग्ण बेडपासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्ह्यातील ऑक्सिजन बेडची व व्हेंटिलेटरची संख्या वाढवा,’ अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केल्या.
सातारा येथील पॉवर हाऊसजवळ घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी चार महिन्यापासून फरार असणार्या सराईत गुंडाला शाहूपुरी पोलिसांनी जेरबंद केले आहे.
उंच उंच टेकड्या, घनदाट जंगल अणि त्या मधोमध असलेला 90 अंशांतील सरळ सुळका. क्षणात धडकी भरावी अशी ती जागा. ढाक बहिरी हा रायगड जिल्ह्यातील सांडशी गावात स्तिथ बुलंद असा किल्ला आहे. ढाकच्या किल्ल्याच्या बाजूस एक सुळका आहे. या सुळक्यास ‘कळकरायचा’ सुळका असे म्हणतात. हा सुळका शिलेदार अॅडव्हेंचर टीमने यशस्वीपणे सर करून छत्तीसगढ येथे नक्षलवादी हल्ल्यात देशासाठी वीरमरण आलेल्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
बहिणीस त्रास देत असल्याच्या कारणावरून सातार्यानजिक खंडोबाचा माळ येथे आकाश राजेंद्र शिवदास या युवकाचा निर्घृण खून करून मृतदेहाची पेटवून विल्हेवाट लावण्याची घटना घडली.
सातारा जिल्हयात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने निर्बंध वाढवणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार, प्राप्त असलेल्या अधिकारान्वये, सातारा जिल्हयात दि. 05/04/2021 रोजीचे 20.00 वाजले पासून ते दिनांक 30/04/2021 रोजीचे 23.59 वा. पर्यंत खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.
बुधवार पेठेत अवैधरित्या गुटखा विक्रीसाठी आणल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली असून गुटखा पानमसाल्याची तब्बल 39 पोती व बोलेरो जीप असा साडेदहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी शाहरुख उर्फ मुबीन अस्लम बागवान वय 28 वर्षे रा 59, बुधवार पेठ सातारा यास पोलिसांनी अटक केली आहे.
सातारा शहरातील शनिवार पेठेत राहणार्या एका पोल्ट्रीचालकाच्या नावावर कर्ज घेत त्याच्याकडून चारचाकी घेवून त्यालाच धमकावत 4.57 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
येथील बॅरिस्टर पी. जी. पाटील प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारी बॅ. पी. जी. पाटील संशोधन शिष्यवृत्ती रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे प्रा. गजानन खामकर यांना जाहीर झाली.
आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नांतून सातारा तालुक्यातील सहा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या नवीन आठ वर्ग खोल्या बांधण्यासाठी निधी मंजूर झाला आहे.
‘कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने जे-जे निर्बंध घातले आहेत, त्या निर्बंधाची जिल्ह्यात प्रभावी अमंलबजावणी करा,’ अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केल्या.