जगभरात क्षयरोग (टीबी) झपाट्याने वाढत असून, त्यामध्ये भारताचा अव्वल क्रमांक आहे. जगाच्या तुलनेत 27 टक्के रुग्ण भारतात असून महाराष्ट्रात हे प्रमाण 10 टक्के आहे, अशी सध्याची क्षयरुग्णांची सद्य:स्थिती आहे. असे असताना सातारा आरोग्य विभागाने क्षयरोग निर्मूलनासाठी कंबर कसली असल्याने, त्यांच्याच कार्याची पावती म्हणून क्षयरोग उच्चाटनासाठी करत असलेल्या कार्याबद्दल ब्रॉन्झ पदक भारत सरकारतर्फे प्रदान करण्यात आले असून, ही सातारा जिल्ह्याकरिता अभिमानास्पद बाब असल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश पाटील य
‘सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग असलेले रुग्ण आढळत आहे. त्यामुळे जे निर्बंध लावले आहेत ते अधिक कडक करावेत. तसेच स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढवून कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढवा,’ अशा सूचना विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केल्या.
‘सातारा शहरालगतचे मोठे उपनगर असलेल्या शाहूपुरी येथील विविध प्रकारचे प्रश्न सातत्याने सोडवले आहेत. प्रत्येक कॉलनीतील अंतर्गत रस्ते, शाहूपुरीसाठीची नवीन पाणीपुरवठा योजना मार्गी लावली. हद्दवाढीत शाहूपुरीचा समावेश झाला असून, आता या परिसराचा झपाट्याने विकास होणार आहे. शाहूपुरीच्या सर्वांगीण विकासासाठी कधीच कमी पडलो नाही आणि यापुढेही कमी पडणार नाही,’ अशी ग्वाही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सलग 21व्या वर्षी गोडोली येथे रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. गोडोली मित्र समूह, युवा मोरया सामाजिक संस्था व कर्तव्य सोशल ग्रुप यांच्या वतीने आयोजित या शिबिरात सामाजिक कार्यकर्ते रवी पवार यांनी न चुकता यंदाही रक्तदान करून तब्ब्ल 40 वेळा रक्तदान करण्याचा विक्रम केला.
मेढा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून दिल्यानंतर या शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून नगरोत्थान योजनेतून 9, दलितेत्तर योजनेतून 4 आणि आण्णा भाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेतून 1 अशा मेढा शहरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या 14 विकासकामांसाठी तब्ब्ल 1 कोटी 76 लाख 28 हजार 794 रुपये निधी मंजूर झाला आहे.
कोरोना महामारला आळा घालण्यासाठी लसीकरण युद्ध पातळीवर सुरु आहे. कोरोनावरील लस पूर्णपणे सुरक्षित आहे. शासनाच्या निकषानुसार सातार्यात लसीकरण सुरु असून लसीकरणाला जेष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लसीकरणसाठी येणार्या नागरिकांचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आभार मानले आणि कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्वांनीच आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन नागरिकांना केले.
‘महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेणे, ही काळाची गरज असून संघर्षाच्या क्षणी आपण स्वावलंबी असले पाहिजे,’ असे प्रतिपादन रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार जान्हवी पाटील यांनी केले.
‘जन जीवनाशी अत्यंत महत्त्वाच्या पद्धतीने निगडित असलेल्या शासनाच्या ‘जल जीवन मिशन’मध्ये सातारा जिल्ह्याने 2020-21 मध्ये दिलेल्या उद्दिष्टानुसार 1 लाख 47 हजार 60 इतकी वैयक्तिक नळजोडणी पूर्ण करून शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जीसी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
उरमोडी नदीपात्रात गजवडी गावानजीक असलेल्या उरमोडी पुलावर जणू कचर्याचे डंपिंग ग्राउंड झाले होते. कोणीही यावे आणि मृत जनावरे आणि कचरा टाकावा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच याचा नाहक त्रास हा स्थानिक तसेच पाणीपुरवठा योजना अंतर्गत येणार्या गावांना होत असल्याने याची दखल माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भैय्या भोसले यांनी घेतली. गजवडी ग्रामपंचायतीशी संपर्क साधत या परिसरात श्रमदान सुरू केले. रविवारी सकाळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, पंचायत समिती उपसभापती अरविंद जाधव, गजवडीचे सरपंच बल्लाळ,
‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. या काळात शासन नियमांनुसार शाळा बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. मात्र, हिंदवी पब्लिक स्कूलने डिजिटल क्लास रुम आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून ऑनलाईन शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले. त्यामुळे शाळा जरी बंद असल्या तरी ‘हिंदवी’च्या विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले नाही. ते अविरतपणे सुरूच आहे. यासाठी शाळा प्रशासन आणि शिक्षकांनी केलेले काम निश्चित कौतुकास्पद आहे,’ असे गौरवोद्गार खा. उदयनराजे भो