मेढा येथील विविध विकासकामांसाठी 1 कोटी 76 लाखांचा निधी
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या विशेष प्रयत्नातून 14 कामे लागणार मार्गी
मेढा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून दिल्यानंतर या शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून नगरोत्थान योजनेतून 9, दलितेत्तर योजनेतून 4 आणि आण्णा भाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेतून 1 अशा मेढा शहरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या 14 विकासकामांसाठी तब्ब्ल 1 कोटी 76 लाख 28 हजार 794 रुपये निधी मंजूर झाला आहे.
सातारा : मेढा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून दिल्यानंतर या शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून नगरोत्थान योजनेतून 9, दलितेत्तर योजनेतून 4 आणि आण्णा भाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेतून 1 अशा मेढा शहरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या 14 विकासकामांसाठी तब्ब्ल 1 कोटी 76 लाख 28 हजार 794 रुपये निधी मंजूर झाला आहे.
मेढा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अनिल शिंदे यांनी नागरिकांच्या मागणीनुसार मेढा नगरपंचायत हद्दीतील विकासकामे मार्गी लावण्याची मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे केली होती. यांनतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून 14 कामांसाठी भरीव निधी उपलब्ध झाला आहे. नगरोत्थान योजनेतून प्रभाग क्र. 4 कडून 5 कडे शेखर पानसे घराकडे जाणार्या गटरचे बांधकाम करणे, प्रभाग क्र. 10 मधील माझगावकर घर ते योगेश कांबळे घराच्या पाठीमागे आरसीसी बंदिस्त गटर बांधणे, मंदिर ते दामोदर देशपांडे घर (चांदणी चौक) पर्यंत एक साईड बंदिस्त गटर व रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, रमेश कुंभार घर ते संत गोरा कुंभार मंदिर रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे, कोयना हॉटेल ते पाठीमागील गटर ते वीर मार्केट ते मोहन बापू वारागडे घर आरसीसी बंदिस्त गटर बांधणे, शासकीय विश्रामगृह ते संतोष सागवेकर व इतर अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण, दोन्ही बाजूला आरसीसी बंदिस्त गटर बांधणे, चांदणी चौक ते कुंभारवाडा येथील किसन जवळ घरापर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, दत्ताअण्णा पवार घर ते संपत शिंदे घर आरसीसी गटर बांधणे, प्रभाग क्र. 12 मधील शशी गुरव घर ते नरसिंह मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या कामासाठी 1 कोटी 13 लाख 62 हजार 581 रुपये निधी मंजूर झाला आहे.
आण्णा भाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेतून प्रभाग क्र. 1 मध्ये बबन जाधव ते नयूम शेख घरापर्यंत आरसीसी गटर, काँक्रीट रस्ता आणि संरक्षक भिंत बांधणे, बबन जाधव ते सिद्धार्थ जाधव घर आरसीसी गटर बांधणे, प्रभाग क्र. 2 मधील बौद्ध विहार ते राहुल कांबळे घरापर्यंत काँक्रीट रस्ता, आरसीसी गटर बांधणे आणि आंबेडकर अंगणवाडी शाळा ते साळुंखे घरापर्यंत काँक्रीट रस्ता बांधणे या कामांसाठी 44 लाख 3 हजार 239 रुपये निधी मंजूर झाला आहे. तसेच दलितेत्तर योजनेतून शासकीय विश्रामगृह ते संतोष सागवेकर व इतर अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण, रस्त्याच्या दोन्ही बाजूला आरसीसी बंदिस्त गटर बांधणे व अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या कामासाठी 18 लाख 62 हजार 974 रुपये निधी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार पूर्ण करून तत्काळ कामे सुरू करा. कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहेराजे यांनी संबंधित अधिकार्यांना केल्या आहेत.