सातारा : सातारा शहरात अवैध दारूधंद्यांवर पोलिसांनी छापे टाकून 6 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत माहिती अशी, भिमाबाई आंबेडकर नगर येथील म्हाडा कॉलनीत असलेल्या एका बिल्डिंगच्या तळमजल्यावर सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून 4 हजार 420 रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारुच्या 36 बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी स्वप्नील सुभाष घुसाळे रा. म्हाडा कॉलनी, सातारा यास सीआरपीसीनुसार नो...
सध्या लॉकडाऊन असूनही जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला हरताळ फासत खणआळीतील काही कापड व्यवसायिकांनी दुकाने सुरू ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले.
इतिहासाचे गाढे अभ्यासक, प्रसिध्द वक्ते व सातारा जिल्हा परिषद सदस्य रयतसेवक प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण (वय 76) यांचे रविवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
सध्या शिक्षणाची गंगा खेडोपाड्यापर्यंत पोहोचल्यामुळे ग्रामीण भागातील मुलीही जिद्द, चिकाटी अन् मेहनतीच्या जोरावर आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवताना दिसताहेत. यातीलच एक उत्तम उदाहरण म्हणजे अनफळेतील स्वातंत्र्यसैनिकाच्या ‘लेकी’नं पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मारलेली मजल...त्याच जयश्री कांबळेंच्या खडतर कहाणीवर टाकलेली ही अल्पशी नजर...
सातारा : सातारा पालिकेच्या बायोमायनिंग प्रकल्पाची कोणतीही सुधारीत प्रशासकीय मंजूरी न घेता तब्बल अनियमित पध्दतीने बिले काढण्यात आल्याची तक्रार नगरविकास आघाडीच्या नगरसेविका लीना गोरे यांचे पती राजू गोरे यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. अनियमित बिले मंजूर करणाऱ्या मुख्याधिकारी व लेखाधिकारी यांची चौकशी करण्याची मागणी गोरे यांनी तक्रार अर्जात नमूद आ...
: जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत असून, मोठ्या प्रमाणात ॲक्टीमेरा इंजेक्शनची टंचाई भासत आहे. रुग्णालयांमध्ये ॲक्टीमेरा इंजेक्शनची मागणी दैनंदिन वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील दैनंदिन वाढत्या रुग्णसंख्येनुसार इंजेक्शनची मागणी विचारात घेता प्र. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा रामचंद्र शिंदे यांनी पुढील आदेश जारी केले आहेत.
सातार्यात विनाकारण बाहेर फिरणार्या 50 जणांची करोना तपासणी करण्यात आली. यामध्ये एक महिला व दोन पुरुष बाधित आढळून आले.
सातारा : शाहूपुरी, सातारा येथे शाहूपुरी पोलिसांच्या डी. बी. पथकाने चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी आलेल्या सराईत चोरट्याला शिताफीने पकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली. जुबेर शबाब शेख वय 19 रा. शुक्रवार पेठ सातारा, असे संशयिताचे नाव असून त्याच्यावर मंदिर दानपेटी फोडून चोरी, एटीएम फोडून चोरी, मोटर सायकल चोरी, चारचाकी चोरी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. याबाबत माहिती अशी, त्याप्रमाणे दि. 28 र...
महिला पोलिसांचा मोबाईल हिसकावून जबरी चोरीचा प्रयत्न करणार्या चोरट्यास शाहूपुरी पोलिसांनी रामनगर कॅनॉल परिसरात शिताफीने जेरबंद केले. यल्ला ऊर्फ विराज अनिल कोळी वय 20 राहणार आकाशवाणी झोपडपट्टी सातारा असे त्याचे नाव आहे.
शहरालगत असणार्या सैदापूर गावच्या हद्दीत शाहूपुरी ते दिव्यनगरी जाणार्या रस्त्यावर आंब्याच्या झाडाच्या आडोशाला साडेसातशे रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी आदित्य संजय मोहिते (रा. दिव्यनगरी, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल केला.