सातारा : जिल्हा प्रशासन रोजच्या रोज रुग्णालयांच्या मागणीनुसार 35 टक्के रेमिडिसवर पुरवठा करीत आहेत. फलटण येथील सुविधा हॉस्पीटलमध्ये वॉर्ड बॉय रेमिडिसवर काळाबाजार करीत असल्याचे समजताच,अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक अरुण गोडसे यांनी वॉर्ड बॉयला रंगेहात पकडले. हा वॉर्ड बॉय रेमिडिसवरचे एक इंजेक्शन 35 हजार रुपयांना विकत असल्याचे निर्दशनास आले आहे. या वॉर्ड बॉयला अटक करण...
मराठा आरक्षणप्रश्नी खासदार, आमदारांना आडवा, त्यासंदर्भात त्यांना जाब विचारा, त्यांच्याकडे बोलण्यासारखे आता काही राहिले नाही. त्यांना मतदार संघात फिरू देऊ नका. अशा शब्दात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आज आरक्षणप्रश्नी प्रतिक्रिया व्यक्त केली.
राजकीय पक्षांच्या कार्यालयावर दगडफेक करणार्या तरुणांना आमदार शशिकांत शिंदे यांनी धमकी दिली आहे. पोलिसांनी संबंधित तरुणांची तक्रार नोंदवून घ्यावी. तसेच त्यांना त्यांचा जीव धोक्यात असल्याने त्यांना पोलिस संरक्षण द्यावे,’ अशी मागणी माथाडी नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
कोरोनामुळे बिकट परिस्थितीचा विचार करून जिल्हा बँकेच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार कृषी पर्यटन कर्जदार सभासदांना 4 टक्के व्याज परतावा, स्थलांतरीत मजूरांना जीवनावश्यक किट, मुख्यमंत्री सहायता निधीला 1 कोटी असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे चेअरमन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.
संपूर्ण देशामध्ये सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 2020-21 या वर्षात 107 कोटी 36 लाख इतका करोत्तर नफा झाला असून निव्वळ नफा 65 कोटी झाला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
सातारा येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर काही अज्ञातांनी दगडफेक करून कार्यालयाचे नुकसान केले. तसेच गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांच्या घरासमोरही काही अज्ञातांनी शेणी जाळण्याचा प्रकार घडला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्याच्या असंतोषातून या घटना घडल्याचे समजले जात आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने व कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आला आहे. त्यानुसार प्र. जिल्हादंडाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दि. 04 रोजीच्या 7 वाजल्यापासून ते दि. 10 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत कराणा, फळे, भाजीपाला, बेकरी, डेअरी, मिठाई, खाद्य पदार्थ दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केले असून या सेवा फक्त घरपोच देण्यासाठी परवानगी मिळाली आहे.
सातारा शहरात घरपोच विक्रीकरीता भाजीपाला, किराणा माल, दुध, फळे विक्रेत्यांची प्रथम यादी सातारा नगरपरिषदेच्या फलकावर डकविण्यात आली असुन यादीमधील विक्रेत्यांनी घरपोच विक्रीचे परवाने सातारा नगरपरिषदेच्या कोरोना कक्षातून प्राप्त करुन घ्यावेत, असे आवाहन नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी केले आहे.
‘काशीळ येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड रुग्णालय कराड व सातारच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. कराड व सातारा तसेच काशीळ परिसरातील नागरिकांना या रुग्णालयाचा लाभ होणार असून, या रुग्णालयामार्फत कोविड रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत,’ असा विश्वास पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशा मागणीची तब्बल एक हजार पत्रे भाजपा पदाधिकार्यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आली.