सातारा येथील राजपथावरील पोलीस करमणूक केंद्राजवळ एक अज्ञात कार अंगावरुन गेल्याने नागेश शंकर भिवटे (वय ३५, रा. मल्हारपेठ, सातारा) यांचा मृत्यू झाला होता. या अपघाताची चौकशी करण्यात येत असून याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळलेल्या सिल्व्हर रंगाची कार चालवणाऱ्या चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
एका विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला उपाशीपोटी ठेवून तिचा छळ करणाऱ्या सातारा तालुक्यातील ब्राम्हणवाडी पती, सासू, सासरे, दीर अशा चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पती मनोज माने, सासू प्रभावती माने, सासरे मधुकर माने आणि दिर शैलेश माने (सर्व रा. ब्राम्हणवाडी, तासगाव, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून
महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आज सातारा शहरातून मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध नोंदविला. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान, लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा शहरातील व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यानुसार दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
प्रभाग क्रमांक १ मध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे येत्या ४८ तासांच्या आत तात्काळ बुजविण्यात यावेत, ते न बुजवल्यास त्या खड्डयांमध्ये वृक्षरोपण करण्यात येईल. ४८ तासानंतर त्याच खड्डयांमध्ये वाहन आदळून एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार
सातारा - सातारारोड ,ता.कोरेगाव येथील यशवंत औद्योगिक वसाहती मध्ये असणाऱ्या गणेश फरसाण कंपनीला आज पहाटे अचानक लाग लागली .हि लागलेली आग इतकी भयानक होती कि संपूर्ण कंपनीच व सर्व साहित्य जळून खाक झाले. याबाबत सविस्तर माहिती अशी कि सातारारोड येथील यशवंत औद्योगिक वसाहती मध्ये नंदकुमार नामदेव कुलकर्णी व विनायक परशुराम गद्रे यांच्या मालकीची गणेश फरसाण कंपनी आहे. या कंपनीत फरसाण ,शेव ,प...
पॉझिटीव्ह दर काहीसा कमी झाल्याने जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सुचनानुसार नव्याने आदेश जारी केले आहेत. कोविड बाधितांचा पॉझीटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस व्यापलेची टक्केवारी नुसार एकूण पाच स्तर निश्चित केलेले आहेत. त्यानुसार सातारा जिल्हा चौथ्या स्तरात असून त्यानुसार निर्बंध काहीसे सैल केले आहेत.
सातारा, दि. 6 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1188 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 36 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
दहिवडी ः माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर नेमण्यात आलेल्या प्रशासक मंडळाविरूध्द उच्च न्यायालयात अपिल करण्यात आले होते. यावर उच्च न्यायालयाने निकाल दिला असून त्यानुसार माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक प्रक्रिया होणार आहे. सध्या राज्यभर कोरोना संसर्गामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र उच्च न्यायालयाने निकाल दिलेल्या स...
सातारा : सातारा जिल्हा कृषी बँक कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सातारा जिल्हा बँकेचे प्रॉपर्टी विभागाचे अधीक्षक विश्वजित राजुरकर यांची निवड सर्वानुमते बिनविरोध झाली. पतसंस्थेच्या संचालक मंडळाची सभा अध्यासी अधिकारी किरण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अमित काळे, माजी चेअरमन उद्धव देशमुख, संजय मांढरे, यशवंत मेंगडे, विश्वास गायकवाड, ...
सातारा : तारळे, ता. पाटण येथील एका घरात जिल्हा विशेष शाखेच्या दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकून शौचालय आणि कारमध्ये लपवून ठेवलेल्या 103 किलो वजनाच्या 836 जिलेटीनच्या कांड्या हस्तगत केल्या. याप्रकरणी गोविंदसिंग बालुसिंग राजपुत (यादव) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात भारतीय स्फोटक कायदा अन्वये गोविंदसिंग बाळुसिंग राजपुत (यादव) याच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला आह...