Satara

esahas.com

मेंदूतील रक्ताभिसरण वाढवण्यासाठी 4 साधे आणि सोपे उपाय!

तुमच्या मेंदूला योग्य आणि चांगल्या पद्धतीने रक्तपुरवठा होण्यासाठी आम्ही आज काही पर्याय सांगणार आहोत.

esahas.com

फलटण तालुक्यात भीषण अपघात; दोन जण जागीच ठार

फलटण तालुक्यातील सुरवडी येथील फलटण- लोणंद मार्गावर जगतापवस्ती नजीक झालेल्या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झाले आहेत, तर १0 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.

esahas.com

ऊसतोड मजुराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

खटाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गजानन अनंता खैरे रा. कल्याण, ता. मेहकर, जि. बुलडाणा या संशयित आरोपीला वडूज पोलिसांनी अटक केली आहे.

esahas.com

देगाव फाटा येथून ७० हजार रुपयांची चोरी

येथील देगाव फाटा, (धनगरवाडी) परिसरात असणाऱ्या धनराज स्टील दुकानातील ड्राव्हरमधील ७० हजार रुपये एक अनोळखी इसम व महिलेने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

चिंचणेर येथे मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हे

चिंचणेर निंब, ता. सातारा येथे एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

सामुदायिक नमाज पठणाने सातारा जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात

प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक असलेली रमजान ईद मंगळवारी सातारा शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी जिल्ह्यात ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांनी प्रार्थना स्थळांवर सामुदायिक नमाज पठण केले. सातारा शहरातील ईदगाह व मैदानासह विविध मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

esahas.com

साताऱ्यात मनसेची महाआरती झालीच!

मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाजामध्ये तेढ निर्माण होवू नये, म्हणून महाआरती करु नका, अशा सूचना काल देवूनही राजवाडा सातारा येथील हनुमान मंदिरात मनसेच्यावतीने मंगळवारी सायंकाळी ६.३0 वाजता महाआरती करण्यातच आली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार होवू नये, यासाठी शाहूपुरी पोलिस ठाण्याच्यावतीने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

esahas.com

सातारा शहराचा कमाल तापमानाचा पारा 38 अंशांवर

मागील काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात तापमान वाढ सुरू आहे. सोमवारी सातारा शहराचा कमाल तापमानाचा पारा 38 अंशांवर गेला. तर थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचे तापमान 31 अंशावर होते. मागील आठवड्यापासून जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असल्याने उष्णतेने अंगाची लाहीलाही होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत.

esahas.com

किसन वीर कारखान्यासाठी ६८ टक्के मतदान

किसन वीर सातारा साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत आज अंदाजे ६८ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली. विद्यमान अध्यक्ष मदन भोसले आणि आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. कोणाच्या बाजूने सभासद कौल देणार हे गुरुवारी (दि ५) स्पष्ट होणार आहे.

esahas.com

शिवराज्य दरबार स्फूर्तीस्थान ही संकल्पना सर्वोत्तम ठरेल : प.पू.डॉ. पुरुषोत्तम ऊर्फ राजाभाऊ महाराज

शिवराज्य दरबार स्फूर्तीस्थान भूमिपूजन हा महत्वाचा सोहळा असून याची संकल्पना श्री.छ.वृषालीराजे भोसले यांची आहे. ज्याप्रकारचे काम स्व. श्री.छ.चंद्रलेखाराजे भोसले करत होत्या तोच वारसा श्री.छ.वृषालीराजे पुढे नेत आहेत. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या प्रकल्पाची संकल्पना सर्वोत्तम ठरणार असून हे स्थान स्फूर्ती, श्रध्दा, प्रेरणेचे स्थान ठरेल असा आशावाद विश्व फाऊंडेशन शिवपुरीचे अध्यक्ष अक्कलकोटचे प.पू.डॉ.पुरुषोत्तम ऊर्फ राजाभाऊ महाराज यांनी व्यक्त केला.