प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक असलेली रमजान ईद मंगळवारी सातारा शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी जिल्ह्यात ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांनी प्रार्थना स्थळांवर सामुदायिक नमाज पठण केले. सातारा शहरातील ईदगाह व मैदानासह विविध मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
सातारा : प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक असलेली रमजान ईद मंगळवारी सातारा शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी जिल्ह्यात ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांनी प्रार्थना स्थळांवर सामुदायिक नमाज पठण केले. सातारा शहरातील ईदगाह व मैदानासह विविध मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
एक महिन्याचे रोजा सोमवारी संपल्याने जिल्ह्यातील सातारा शहर आणि ग्रामीण भागात दोनशेहून अधिक ठिकाणी रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मशिदीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शहरात विविध ठिकाणी ईद मुबारक असे शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून आले. मुस्लिम बांधवांनी शहरातील विविध मशिदीमध्ये नमाज पठण केले. या निमित्ताने सायंकाळी शीरखुर्मा मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते.
मुस्लिम धर्मीयांसाठी रमजान ईद हा वर्षातील मोठा पवित्र सण असतो. यंदा राज्य सरकारकडून सर्व सणांवरील निर्बंध हटवल्याने आज जिल्ह्यात ईद उत्साहात साजरी करण्यात आली. सातारा शहरातील पोवई नाका मस्जिद, एसटी स्टँड मस्जिद, पोलीस हेडकॉटर मस्जिद, शाही मस्जिद, कासा मस्जिद, मदिना मस्जिद, मक्का मस्जिद, बेगम मस्जिद, संगमनगर मस्जिद, पिरवाडी मस्जिद, कब्रस्थान मस्जिद, येथे रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले व एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. मशिदीच्या परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. रमजान निमित्त विविध मिठाई व भेटवस्तूनि बाजारपेठा फुलून गेल्या होत्या.


