चिंचणेर निंब, ता. सातारा येथे एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : चिंचणेर निंब, ता. सातारा येथे एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १ मे रोजी ५.४५ वाजण्याच्या सुमारास चिंचणेर निंब येथे माहेरी वडिलांच्या घरासमोर सारिका विशाल मोरे, वय ३०, रा. गुरु ज्योती अपार्टमेंट, मंगळवार तळे, सातारा या महिलेला रस्त्यावर येण्या-जाण्याच्या कारणावरून अर्जुन डांगे, दीपक डांगे, अभयसिंह डांगे, लक्ष्मीबाई डांगे, सर्व रा. चिंचणेर निंब यांनी लाकडी दांडक्याने मारहाण शिवीगाळ, दमदाटी केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


