साताऱ्यात मनसेची महाआरती झालीच!
मनसे पदाधिकारी- कार्यकर्त्यासह सातारकरांची बहुसंख्येने उपस्थिती
मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाजामध्ये तेढ निर्माण होवू नये, म्हणून महाआरती करु नका, अशा सूचना काल देवूनही राजवाडा सातारा येथील हनुमान मंदिरात मनसेच्यावतीने मंगळवारी सायंकाळी ६.३0 वाजता महाआरती करण्यातच आली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार होवू नये, यासाठी शाहूपुरी पोलिस ठाण्याच्यावतीने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सातारा : मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाजामध्ये तेढ निर्माण होवू नये, म्हणून महाआरती करु नका, अशा सूचना काल देवूनही राजवाडा सातारा येथील हनुमान मंदिरात मनसेच्यावतीने मंगळवारी सायंकाळी ६.३0 वाजता महाआरती करण्यातच आली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार होवू नये, यासाठी शाहूपुरी पोलिस ठाण्याच्यावतीने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या महाआरतीच्यापूर्वी जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, पदाधिकारी यांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत.
ईदच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाआरती करण्याचे सांगितले होते. पण काल अचानकपणे त्यांनी यु टर्न घेतला. मात्र, तरीही मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून राजवाडा चौपाटीनजिकच्या हनुमान मंदिर, सातारा येथे महाआरती करण्यात आली. या महाआरतीस मनसे पदाधिकारी- कार्यकर्त्यासह सातारकरांची उपस्थिती बहुसंख्येने होती. 'राज ठाकरे यांचा विजय असो' अशा घोषणा देत राजवाडानजिकच्या हनुमान मंदिर येथे महाआरती करण्यात आली. यावेळी शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. या महाआरतीबाबत कायदेशीर परवानगीही काढण्यात आली होती. मात्र, तरीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार, उपाध्यक्ष राहुल पवार, शहरउपाध्यक्ष भरत रावळ, वैभव वेळापुरे, अदर शेख, मुक्तार पालकर, सलीम कच्छी, तेजश्री राजे, सुषमा गायकवाड, अवि भोसले यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. या महाआरतीस सातारा शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पो.नि. भगवानराव निंबाळकर, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पो. नि. संजय पतंगे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली.