येथील देगाव फाटा, (धनगरवाडी) परिसरात असणाऱ्या धनराज स्टील दुकानातील ड्राव्हरमधील ७० हजार रुपये एक अनोळखी इसम व महिलेने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील देगाव फाटा, (धनगरवाडी) परिसरात असणाऱ्या धनराज स्टील दुकानातील ड्राव्हरमधील ७० हजार रुपये एक अनोळखी इसम व महिलेने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २ मे रोजी ११.५५ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील देगाव फाटा, ( धनगरवाडी) परिसरात असणाऱ्या धनराज स्टील दुकानात फॉर्च्युनर गाडी मधून एक अनोळखी इसम व महिला आली. दुकानातील अकाऊंट ज्योती पवार यांना बोलण्यामध्ये गुंतवून दुकानातील ड्राव्हरमधुन ७० हजार रुपये चोरून नेल्याची तक्रार योगेश नानकचंद ओसवाल यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.


