Satara

esahas.com

शेतकरी एकल महिलांसाठीचा विनामूल्य बियाणे वाटप कार्यक्रम माणुसकीवर विश्वास वाढविणारा

सातारा जिल्ह्यातील घेतलेल्या आढावा बैठकीत ठरल्यानुसार आज माणदेशी फाउंडेशनने या महिलांना विनामूल्य बियाणे देण्याचा घेतलेला कार्यक्रम हा या महिलांचा माणुसकीवरील विश्वास अधिक दृढ करणार आहे, असे मत आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

esahas.com

अजिंक्‍यतारा कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

सातारा तालुक्यातील राजकारणाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू असणाऱ्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सहकार विभागाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 21 जागांसाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. कारखान्यासाठी 17 जुलै रोजी मतदान होणार असून 19 जुलैला मतमोजणी होणार आहे.

esahas.com

सातारा बिझनेस सेंटर समोर गाडीची काच फोडून लॅपटॉप चोरला

सातारा बिझनेस सेंटर समोर गाडीची मागील काच फोडून अज्ञाताने दहा हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरल्याची घटना दिनांक 26 मे 2022 रोजी घडली आहे.

esahas.com

विवाहितेच्या जाचहाट प्रकरणी नवऱ्यासह सासू- सासरे यांच्यावर गुन्हा

माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासरे यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विवाहिता सोनाली सयाजी केंडे यांनी फिर्याद दिली आहे.

esahas.com

शनिवार पेठेतून लहानग्या मुलीसह विवाहिता बेपत्ता

दळण घेऊन येते असे सांगून घरातून चाळीस वर्षीय विवाहिता आपल्या नऊ वर्षाच्या मुलीसह शनिवार पेठ सातारा येथून बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी प्रशांत रघुनाथ आपटे वय 44 राहणार 102 शनिवार पेठ यांनी सातारा शहर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे.

esahas.com

शेतकऱ्यांनी योग्य प्रमाणात पाऊस झाल्यावरच पेरणी करावी

शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करु नये, योग्य प्रमाणात पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.

esahas.com

मुख्याधिकार्‍यांच्या लेखी आश्‍वासनानंतर इम्रान मुल्ला यांचे उपोषण स्थगित

राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्यावतीने इम्रान मुल्ला आणि सहकार्‍यांनी दिनांक 6 पासून सुरु केलेले उपोषण मुख्याधिकार्‍यांच्या लेखी आश्‍वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे.

esahas.com

जगद्गुरु तुकोबारायांच्या ओझरत्या उल्लेखाने महाराष्ट्राचा अपमान

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहू येथील शिळा मंदीर लोकार्पण सोहळ्यात जगद्गुरू तुकोबारायांचा अनेक राजकीय प्रस्तावनानंतर ओझरता उल्लेख करून त्यांचा अपमान केला आहे. याशिवाय देहू चे धार्मिक आणि सुधारणावादी व्यासपीठ त्यांनी भाजपच्या प्रचारासाठी वापरले आहे. हे वारकरी संप्रदाय यासाठी अपमानकारक आहे

esahas.com

रायगडी राजधानी सातार्‍याचा सन्मान

49 व्या शिवराज्याभिषेक दिनी दुर्गदुर्गेश्वर रायगडावर शिवभक्तीला उदंड भरते आले होते. स्वराज्याची जिवंत राजधानी सातारा येथून आलेल्या मंगल कलशाचे रायगडावर जल्लोषांत स्वागत होऊन मान्यवरांच्या हस्ते त्या मंगल कलशाने राज्याभिषेक करण्यात आला. त्या आधी कलशाच्या निघालेल्या शोभायात्रेवर हजारो शिवभक्तांनी फुलांचा वर्षाव केला.

esahas.com

मद्यधुंद पोलीस वाहनचालकाने दोन दुचाकींना ठोकरले; गुन्हा दाखल

सातारा-कोरेगाव रस्त्यावरील शहरालगत संगमनगर येथे पोलिसांच्या आयशर व्हॅनने दोन दुचाकींना धडक दिल्यानंतर त्यात दोघेजण गंभीर जखमी झाले असून अन्य दोघांना दुखापत झाली आहे. बेदरकारपणे चालवणार्‍या पोलिसाने मद्यप्राशन केले असल्याचा उल्लेखही तक्रारीत झाल्याने खळबळ उडाली असून शहर पोलिस ठाण्यात व्हॅनवरील पोलिस चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.